तान्याने जरी हा शो जिंकला नसला तरी, ती टॉप 5 फायनलिस्टपैकी (Top 5 Finalist) एक होती. त्यामुळे ती या सिझनची एक महत्त्वाची आणि टॉप कंटेस्टंट ठरली. बिग बॉसने तान्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे. आता ती कुठे जाते, काय करते, याबद्दल तिच्या चाहत्यांना आणि सामान्य लोकांनाही उत्सुकता आहे.
'ती श्रीमंत आहे की खोटं बोलतेय?' याच प्रश्नावर लोकांची नजर
advertisement
बिग बॉसच्या घरात असताना तान्या मित्तलने आपल्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. उत्पन्न आणि व्यवसाय: तिचे मोठे व्यवसाय आहेत, फॅक्टरी आहेत, ज्यामध्ये साडी, सोलार पॅनलची फॅक्टरी असल्याचं ती म्हणते. तिचं आलिशान घर हे खूपच मोठं आहे. बिग बॉसच्या घरा एवढं तर तिचं गार्डन आहे वैगरे, एवढंच नाही तर तान्या बॉडीगार्ड्ससह फिरते असं देखील तिने सांगितलं. शिवाय तिच्या घरी चांदीची भांडी आहेत, ती चांदीच्या बाटलीतूनच पाणी पिते वैगरे... या सगळ्या गोष्टीतून तान्याने अशी हवा केली ती खूपच श्रीमंत घरातून येते. पण हे खरंच आहे का की ही फक्त एक अफवा आहे? असा प्रश्न मिडियापासून लोकांच्या मनात उद्भवला आहे. त्यामुळे आता तान्या बाहेर पडल्यानंतर तिचं सत्य तपासण्यासाठी लोक तिच्यावर नजर ठेवून आहेत हे नक्की.
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच तान्याचे हे 'सत्य' जाणून घेण्यासाठी लोकांसोबतच पापाराझींची (Paparazzi) देखील तिच्यावर करडी नजर आहे. पापाराझी तिला सतत फॉलो करत आहेत.
अखेरीस, बाहेर पडल्यानंतर तान्या मित्तल नक्की कुठे जात आहे, या प्रश्नाचे उत्तर नुकतेच मिळाले.
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर लगेचच, तान्या मित्तल मंगळवारी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरामध्ये (Siddhivinayak Temple) दर्शनासाठी पोहोचली. ती सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी जात असताना, पापाराझींनी तिचा पाठलाग केला आणि तिला मंदिराच्या आवारत स्पॉट केलं. तान्या मंदिराच्या परिसरात पायी चालत असतानाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये तान्या अतिशय साध्या वेशात, नेहमीप्रमाणे साडीत गणेशाच्या दर्शनासाठी आली होती. मंदिराबाहेर तिला अनेक फॅन्स भेटले. त्यांच्यासोबत तान्याने सेल्फी देखील काढले.
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तान्या मित्तलने कोणतेही मोठे सेलिब्रेशन करण्याऐवजी, सर्वात आधी गणपती बाप्पाचे दर्शन घेणे पसंत केले. यामुळे तिच्या चाहत्यांना तिच्या धार्मिक श्रद्धेची झलक मिळाली आहे. आता तिचा पुढचा प्रवास काय असेल, ती तिच्या कामाला कशी सुरुवात करते, घरी परतल्यावर ती आपलं घर आणि फॅक्टरी दाखवते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
