गेल्या अनेक महिन्यांपासून दोघांच्या डिवोर्सच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर दोघे अनेकदा एकत्र दिसले. त्यांच्या एकत्र येण्यानेच सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. आता पुन्हा एकदा ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र दिसले. यावेळीही त्यांचा रोमँटिक अंदाज कुठेच लपला नाही. अभिषेक नेहमीच ऐश्वर्याबरोबर उभा आहे हे पुन्हा एकदा दिसून आलं.
( Virosh Wedding : मराठमोळा दिग्दर्शक पोहोचला विरोशच्या रिसेप्शनला, रश्मिका-विजयसोबत काय कनेक्शन? )
advertisement
अर्जुन आणि सानियाच्या लग्नसमारंभासाठी ऐश्वर्यानं नाजूक भरतकाम केलेला निळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. तर अभिषेकने ब्लॅक कलरचा सूट परिधान केला होता. ऐश्वर्याने तिच्या ग्लॅमरस लुकनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी पापाराझींना एकत्र फोटोसाठी पोझेस दिल्या. फोटो काढून निघत असताना अभिषेकच्या कृतीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. आधी अभिषेक वळतो नंतर ऐश्वर्या त्याच्या मागून येते मध्ये असलेली पायरी ओलांडण्यासाठी अभिषेक ऐश्वर्याचा हात हातात घेतो. ऐश्वर्या देखील अलगद त्याच्या हातात हात देते.
अभिषेक आणि ऐश्वर्या यांना अनेक दिवसांनी एकत्र पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ऐश्वर्याचं सौंदर्याचंही अनेकांनी कौतुक करत हार्ट इमोजी शेअर केलेत. यावेळीही बच्चन फॅमिली वेगवेगळी दिसून आली. अभिषेक -ऐश्वर्या आधी पोहोचले त्यानंतर अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी एकत्र हजेरी लावली. त्यामुळे बच्चन फॅमिलीत काही वाद आहेत का अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्यात. कारण याआधी देखील अनेक मोठ्या इव्हेंट्सना बच्चन फॅमिली वेगवेगळे आल्याचं दिसून आलं आहे.
अर्जुन आणि सानिया यांचा ऑगस्ट महिन्यात साखरपुडा झाला होता. सचिन तेंडुलकरची सून
सानिया चंदोक ही यशस्वी उद्योजिका असून ती मुंबईतील नामांकित उद्योगपती रवी घई यांची नात आहे.
