गेल्या काही आठवड्यांपासून नील आणि ऐश्वर्या वेगळे राहत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दोघेही सोशल मीडियावर एकत्र पोस्ट करत नाहीत, तसेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही दिसत नाहीत. त्यात भर म्हणजे अलीकडेच नील भट्ट एका मिस्ट्री गर्लसोबत मुंबईत फिरताना दिसला, आणि यानंतर अफवांना आणखी उधाण आलं.
6 मुलांच्या वडिलांवर झालं प्रेम, विना लग्नाची अभिनेत्री बनली दोन मुलांची आई
advertisement
पापाराझींनी नीलला त्या तरुणीसोबत पाहताच फोटो काढण्याचा प्रयत्न केला, पण अभिनेत्याने कॅमेऱ्यांपासून नजर चुकवत गाडीने तात्काळ निघून गेला. त्याच्यासोबत असलेली ती तरुणी मात्र वेगळ्या दिशेने चालत गेली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. काही चाहत्यांनी नीलचा बचाव करत “ती दोघांची कॉमन फ्रेंड आहे” असं सांगितलं, तर इतरांनी अभिनेत्यावर पत्नीशी फसवणुकीचा आरोप केला.
दरम्यान, ऐश्वर्या शर्मानेही काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत कबूल केलं होतं की, "आमच्यात काही गोष्टींवरून मतभेद आहेत, पण आम्ही आमचं नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहोत." आता या दोघांमधील नातं खरंच तुटण्याच्या मार्गावर आहे का, की फक्त गैरसमजांचा गुंता आहे याविषयी काही माहिती अद्याप समोर आलेली नाही.