Akshay Kumar : अक्षय कुमारचा 'जॉली एलएलबी 3' हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगलीच कमाई करत आहे. अशातच या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ताने अक्षय कुमार 'आप की अदालत' या कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमात अक्षय कुमारने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबतीतील अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. आपण सातवी नापास असल्याचं खिलाडी कुमार स्वत:चं म्हणाला आहे.
advertisement
अक्षय कुमारचा व्हिडीओ व्हायरल
आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना अक्षय कुमार म्हणाला की, मी सातवीत नापास झालो होतो. अक्षयच्या या वक्तव्याने उपस्थित सर्वांमध्ये चांगलाच हशा पिकला. त्यावेळी अक्षय म्हणाला,"तुम्हा सर्वांसाठी हा धक्का असेल पण मी खरचं नापास झालो होतो". एक कठीण प्रसंग मजेदार पद्धतीने अक्षय सांगताना दिसून आला आहे.
Samir Choughule : 'आज हास्यजत्रा नसतं तर...' 15 वर्षांपासूनचा स्ट्रगल, सांगताना भावुक झाले समीर चौघुले
अक्षय कुमारचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात अक्षयला पत्नी ट्विंकल खन्नाला घाबरतो का? असा प्रश्नही विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत खिलाडी कुमार म्हणाला,"मी ट्विंकलला न घाबरण्याचा प्रयत्न केला तर ती माझं जगणं हैराण करेल".
खिलाडीला अभिनेताच व्हायचं होतं...
अक्षय कुमार एक किस्सा शेअर करत म्हणाला,"माझ्या वडिलांनी मला विचारलं होतं की, आयुष्यात काय करण्याचं ठरवलं आहेस? त्यावेळी अभिनेता होण्याची इच्छा मी त्यांच्याकडे व्यक्त केली होती".
अक्षय कुमारचे आगामी प्रोजेक्ट
अक्षय कुमारचा 'जॉली एलएलबी 3' हा चित्रपट लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सुभाष कपूरने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात खिलाडी अरशद वारसीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसला आहे. 'जॉली एलएलबी 3' हा एक कोर्टरूम ड्रामा आहे. चाहत्यांमध्ये या चित्रपटाची चांगलीच क्रेझ आहे. खिलाडी नुकताच 'बिग बॉस 19'मध्ये आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसून आला होता.