सोलापूर शहरातील केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे शिक्षण शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना उपयुक्त होईल असा सोलार पॅनल क्लिनिंग डिव्हाइस बनवला आहे. सौर ऊर्जेचा वापर करत असताना त्यावर धूळ किंवा माती बसते आणि त्यामुळे ऊर्जा कमी मिळते. तेव्हा सौर ऊर्जा स्वच्छ करण्यासाठी खर्च अधिक येतो.
ऑनलाईन घर भाडं भरत असाल तर थांबा! ही बातमी खास तुमच्यासाठी; होणार मोठा बदल
advertisement
म्हणून विद्यार्थ्यांनी स्वयंचलित सोलर पॅनल क्लिनिंग डिव्हाइस बनवला असून याचा खर्च देखील कमी येतो. मोटार, एस एम पी एस कन्व्हर्टर याचा वापर करून हा क्लिनिंग डिव्हाइस बनवण्यात आला आहे. तर हा डिव्हाइस बनवण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी विद्यार्थ्यांना लागलेला आहे.
सोलार पॅनलवर धूळ माती बसल्याने ऊर्जा तयार करण्याची क्षमता कमी होते. तेव्हा ते स्वच्छ करण्यासाठी येणारा खर्च आहे तो खूप जास्त येतो किंवा बिल्डिंगवर असलेल्या सोलर पॅनलला स्वच्छ करण्यासाठी कधी कधी अवघड असतं. पण या स्वयंचलित सोलार पॅनल क्लिनिंग डिव्हाइसवरून सोलर पॅनल स्वच्छ करणे सोपे झाले आहे. सोलार पॅनलवर हा क्लिनिंग डिव्हाइस बसवल्यावर त्यावर पाणी मारायचं आणि हा डिव्हाइस एकदा सुरू केला तर सोलार पॅनल पूर्णपणे स्वच्छ होतात. सोलर पॅनल व्यवस्थित स्वच्छ झाल्यावर त्याची ऊर्जा तयार करण्याची क्षमता देखील वाढते.