आलियाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती पापाराझींना जोरदार ओरडताना दिसत आहे. फोटोग्राफर्सवरील तिचा राग कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत आहे. ब्लिडिंगमधून बाहेर व्हा, असं ती म्हणताना दिसतेय.
( आधी धनुषसोबत अफेअरच्या चर्चा, आता थेट बिपाशाची मागितली माफी; मृणाल ठाकूरनं असं केलं काय? )
आलिया भट्ट पिकलबॉल गेम खेळते हे सर्वांनाच माहिती आहे. आलिया नुकतीच पिकलबॉल खेळण्यासाठी गेली होती. व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय, ती तिच्या गाडीतून खाली उतरते. समोर पाहते तर पापाराझी बिल्डिंगच्या बाहेर फोटो काढण्यासाठी उभे असतात. व्हिडीओ काढण्यासाठी ते आलियाबरोबर बिल्डिंगमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात.
advertisement
व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, आलिया भट्ट ब्लिडिंगमध्ये एन्ट्री करताच पापाराझींनी तिला घेरले. हे बघून ती चांगलीच चिडली. रागात आलिया म्हणाली, "गेटच्या आत येऊ नका. ही तुमची बिल्डिंग नाही. प्लिज बाहेर जा, प्लिज बाहेर जा. तुम्ही आता जा इथून. ही तुमची बिल्डिंग नाही, तुम्ही आत येऊ शकत नाही, तुम्ही ऐकत नाही आहात." आलिया भट्टचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आलिया भट्ट वर्कफ्रंट
आलिया भट्टच्या आगामी चित्रपटांमध्ये YRF चा 'अल्फा' हा चित्रपट आहे. हा एक महिला-केंद्रित स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. याशिवाय ती संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' मध्ये देखील दिसणार आहे. ज्यामध्ये ती रणबीर कपूर आणि विकी कौशलही असणार आहेत. हा एक पीरियड रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे.