आधी धनुषसोबत अफेअरच्या चर्चा, आता थेट बिपाशाची मागितली माफी; मृणाल ठाकूरनं असं केलं काय?

Last Updated:

Mrunal Thakur Apologizes : एकीकडे धनुषबरोबर अफेअरच्या चर्चा तर दुसरीकडे मृणाल ठाकूरने बिपाशा बसूची माफी मागितली आहे. दोघींमधला वाद नेमका काय होता? पाहूयात. 

News18
News18
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या चर्चेत आहे. साऊथ अभिनेता धनुषबरोबर तिचं अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण आम्ही फक्त चांगले मित्र आहोत असं स्पष्टीकरण मृणालनं यावर दिलं. तरी देखील मृणाल आणि धनुष यांचे काही व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. एकीकडे धनुषबरोबर अफेअरच्या चर्चा तर दुसरीकडे मृणालने अभिनेत्री बिपाशा बसूची माफी मागितली आहे. बिपाशीची माफी मागण्याइतकं मृणालनं केलं तरी काय?
मृणाल आणि बिपाशा बसू सध्या चर्चेत आहेत. अभिनेत्री मृणाल ठाकूरने बिपाशावर केलेल्या कमेंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हायरल व्हिडीओनंतर अभिनेत्री मृणाल ठाकूर हिला माफी मागण्याची वेळ आली आहे. मृणालनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर करत जाहीर माफी मागितली आहे. तो माझा मुर्खपणा होता असं म्हणत मृणालने पोस्ट शेअर केली आहे. मृणालनं पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे? दोघींमधला वाद नेमका काय होता? पाहूयात.
advertisement

मृणालने माफी मागितली 

मृणालने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "19 वर्षांची मी माझ्या टिनएजमध्ये अनेक मूर्ख गोष्टी बोलले. मला नेहमीच माझ्या आवाजाचे वजन किंवा वाईट शब्द, अगदी विनोदातही, किती अर्थ असू शकतात हे समजत नव्हते मला त्याबद्दल खूप वाईट वाटते. मी मनापासून माफी मागू इच्छिते.कोणाचंही बॉडी-शेम करण्याचा माझा हेतू नव्हता."
advertisement
तिनं पुढे लिहिलंय, "हे मी एका मुलाखतीत हलक्या फुलक्या विनोदात म्हटलं होतं पण ती गोष्ट खूप पुढे गेली.
मला समजतंय की हे कसं वाटलं असेल आणि खरंच मला माझे शब्द जपून वापरायला पाहिजे होते. बदलत्या वेळेबरोबर मी हे अनुभवलं आहे की सुंदरता प्रत्येक रुपात असते. आणि आता या गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरतात."
advertisement

मृणाल ठाकूर बिपाशा बसूबद्दल काय म्हणाली?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ मृणाल ठाकूर कुमकुम भाग्यच्या वेळी दिला होता. तिच्याबरोबर अर्जित देखील आहे. अर्जिदने मस्करीत तिला हेडस्टँड करण्याचे आव्हान दिले. ज्यावर तिने विनोद केला की ती त्याच्या डोक्यावर बसून संतुलन राखू शकते. त्यानंतर अर्जितने तिला पुन्हा पुश-अप करण्याचे आव्हान दिले.
advertisement
मृणालने मस्करीत म्हटलं,  तो कदाचित एका सुदृढ महिलेशी लग्न करू इच्छितो. अरिजीतने असेही कबूल केले की त्याला त्याच्या आयुष्यात एक वक्र महिला हवी आहे. यावर, मृणाल म्हणाली की तो बिपाशा बसूला निवडू शकतो. मृणाल ठाकूर म्हणाली, "तुला एका पुरुषी आणि स्नायू असलेल्या मुलीशी लग्न करायचे आहे का? बिपाशाशी लग्न कर. मी बिपाशापेक्षा खूपच चांगली आहे, ठीक आहे?"
advertisement

मृणाल ठाकूरच्या कमेंटवर बिपाशा बसूची प्रतिक्रिया

मृणाल ठाकूरचा व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होताच, बिपाशा बसूने त्यावर प्रतिक्रिया दिली. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये महिलांना मजबूत मसल्स डेव्हलप करण्यासाठी प्रोत्साहित केलं. ज्यामुळे त्यांचे शारीरिक आरोग्यच नव्हे तर मानसिक आरोग्य देखील सुधारेल.
मृणालचे नाव न घेता, बिपाशा बसूने तिच्या नोटमध्ये लिहिले, "बलवान महिला एकमेकांना उंचावतात. सुंदर महिलांनो, तुमचे मसल्स बळकट करा... आपण बळकट असले पाहिजे... स्नायू तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य कायमचे चांगले ठेवण्यास मदत करतात! महिलांनी मजबूत दिसू नये किंवा शारीरिकदृष्ट्या बळकट नसावे ही जुनी मानसिकता मोडून काढा!"
मराठी बातम्या/मनोरंजन/
आधी धनुषसोबत अफेअरच्या चर्चा, आता थेट बिपाशाची मागितली माफी; मृणाल ठाकूरनं असं केलं काय?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement