अभिनेत्री आलिया भट्ट नवऱ्याचा 'एनिमल' हा सिनेमा पाहण्यासाठी पोहोचली. सिनेमा पहिल्यानंतर आलियाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. नवऱ्याच्या नव्या सिनेमावर आलिया चांगलीच खुश असल्याचं पाहायला मिळतंय. खरंतर रणबीर कपूरच्या आतापर्यंतच्या करिअरमधला एनिमल हा सिनेमा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आतापर्यंतच्या सगळ्या सिनेमातील त्याचा हा वेगळा सिनेमा आहे.
हेही वाचा - Sam Bahadurच्या स्क्रिनिंगला सासूबरोबर लावली हजेरी; संस्कारी सून कतरिनाचा नवा Videoव्हायरल
advertisement
'एनिमल' सिनेमा आणि त्यातील रणबीरचा अवतार पाहून आलिया चांगलीच एम्प्रेसझाली आहे. थिएटरमधून बाहेर येताच आलियानं रणबीरच्या एनिमलला 'खतरनाक' अशी रिअँक्शन दिली आहे. आलिया आपली आई सोनी राजदान, बहिण शाहीन आणि वडील महेश भट्ट यांच्याबरोबर सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला गेली होती. आलियानं दिलेला 'एनिमल' सिनेमाचा हा एका वाक्यातील रिव्ह्यू सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय, आलिया तिच्या फॅमिलीबरोबर 'एनिमल' पाहून बाहेर येतेय. बाहेर येताच पापाराझी तिला कसा वाटला सिनेमा असं विचारतात. तेव्हा आलिया आधी म्हणते 'अच्छा था'. त्यावर पापाराझी तिला पुन्हा एकदा विचारतात. तेव्हा ती 'खतरनाक ! खतरनाक!' असं म्हणते. आलियाची ही रिअँक्शन सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय.
अभिनेत्री आलियानं नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं होतं की, आम्ही एकमेकांच्या कामाबद्दल विस्तृत संवाद साधतो. एकमेकांच्या कामाचा आम्ही सन्मान करतोय. एक कलाकार म्हणून आम्ही एकमेकांच्या कामाकडे पाहतो.