Sam Bahadurच्या स्क्रिनिंगला सासूबरोबर लावली हजेरी; संस्कारी सून कतरिनाचा नवा Videoव्हायरल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
कतरिनानं विक्की कौशलबरोबर लग्न केल्यानंतर ती तिच्या सासरच्या माणसांबरोबर चांगली रमली आहे. सासूबरोबर कतरिनाचं खास कनेक्शन असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. पण हा व्हिडीओ तुम्ही एकदा पाहाच.
मुंबई, 30 नोव्हेंबर : अभिनेत्री कतरिना कैफचा टाइगर 3 हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. सिनेमात बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. कतरिनाचा सिनेमा रिलीज होऊन काही दिवस होताच कतरिनाच्या नवऱ्याचा म्हणजेच अभिनेत्री विक्की कौशलचा नवा सिनेमा देखील रिलीज होतोय. विक्की कौशलचा सॅम बहादूर हा नवा सिनेमा 1 डिसेंबरला रिलीज होतोय. रिलीजआधी सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग करण्यात आलं. दरम्यान या स्क्रिनिंगला विक्कीची संस्कारी बायको आणि संस्कारी सून कतरिना तिच्या सासूबरोबर पोहोचली होती. सॅम बहादुरच्या स्पेशल स्क्रिनिंग दरम्यानचा कतरिना आणि तिच्या सासूचा व्हिडीओ समोर आला आहे.
कतरिनानं विक्की कौशलबरोबर लग्न केल्यानंतर ती तिच्या सासरच्या माणसांबरोबर चांगली रमली आहे. सासूबरोबर कतरिनाचं खास कनेक्शन असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. कतरिना सासूबाईंची संस्कारी सून आहे असं म्हटलं जातं. या संस्कारी सूनेनं नवऱ्याच्या सिनेमाच्या स्क्रिनिंगला आलेल्या सासूबाईंबरोबर काय केलं हे तुम्हीच पाहा.
हेही वाचा - Disha Vakani : तारक मेहतामध्ये परत येतेय दयाबेन; 6 वर्षांनी अशी दिसतेय अभिनेत्री दिशा वकानी, Latest Photo
advertisement
सॅम बहादुरच्या स्क्रिनिंगला कतरिना तिच्या सासू -सासऱ्यांबरोबर आली होती. स्क्रिनिंगआधी तिघांनी विक्कीची भेट घेतली. आई-वडिलांना पाहताच विक्की दोघांच्या पाया पडला आणि तिघांनी पापाराझींना काही फोटो दिले. सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी कतरिनानं खास ब्लॅक कलरचा स्ट्रेपलेस ड्रेस घातला होता.
advertisement
सिनेमाच्या स्क्रिनिंग नंतर कतरिना सासू-सासऱ्यांबरोबर बाहेर पडली. तिथे तिला भेटण्यासाठी चाहत्यांनी आणि पापाराझींनी गर्दी केली. दरम्यान या गर्दीत कतरिना सासू बाईंना सांभाळताना दिसली. व्हिडीओमध्ये दिसतंय की, कतरिनानं सासूबाईंना दोन्ही हातांना पकडलं आहे आणि ती त्यांना नेमकं कुठे जायचं हे सांगताना दिसतेय. त्यानंतर शेवटी ती सासूला मिठी देखील मारताना दिसतेय.
advertisement
कतरिनाचं सासूबरोबर असलेलं बॉन्डिंग पाहून चाहत्यांनी तिला पुन्हा एकदा संस्कारी सून असं म्हटलं आहे. इतक्या गर्दीमध्ये कोणताही ड्रामा किंवा ओव्हर अँक्टिंग न केल्याचं सगळ्यांनी कौतुक केलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 30, 2023 7:42 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Sam Bahadurच्या स्क्रिनिंगला सासूबरोबर लावली हजेरी; संस्कारी सून कतरिनाचा नवा Videoव्हायरल