‘कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचा झेल घेत जो रूटने राहुल द्रविडचा एखाद्या आउटफिल्डरकडून सर्वाधिक टेस्ट कॅच घेण्याचा विक्रम मोडला?’
पर्याय –
A. यशस्वी जैसवाल
B. करुण नायर
C. बी साई सुदर्शन
D. के. एल. राहुल
सिद्धार्थ उत्तराबाबत खात्रीशीर नव्हते, म्हणून त्यांनी ऑडियन्स पोलचा वापर केला आणि पर्याय B. करुण नायर निवडला, जो बरोबर होता.
advertisement
शाहरुखच्या चित्रपटाने रचला इतिहास, रिलीजआधीच केला हा रेकॉर्ड, बजेट ऐकून व्हाल शॉक
यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांना 12.50 लाख रुपयांचा 12 वा प्रश्न विचारला –
‘1938 मध्ये काँग्रेसच्या हरिपुरा अधिवेशनासाठी पोस्टर तयार करण्यासाठी कोणत्या चित्रकाराला आमंत्रित करण्यात आले होते?’
पर्याय –
A. जामिनी रॉय
B. अमृता शेरगिल
C. अबनींद्रनाथ ठाकुर
D. नंदलाल बोस
सिद्धार्थ यांनी 50-50 लाइफलाइनचा वापर करून पर्याय D. नंदलाल बोस निवडला, जो योग्य ठरला.
मात्र ते 25 लाख रुपयांच्या प्रश्नावर अडकले. त्यांच्याकडे एकही लाइफलाइन शिल्लक नव्हती. प्रश्न होता –
‘वॉलेस रेषा’ ही एक काल्पनिक सीमा आहे, जी खालीलपैकी कोणत्या देशाला वेगवेगळ्या जैवविविधतेच्या प्रदेशांमध्ये विभाजित करते?’
पर्याय –
A. न्यूझीलंड
B. हैती
C. इंडोनेशिया
D. मॅडगास्कर
या 13व्या प्रश्नावर सिद्धार्थ यांनी खेळ सोडला आणि 12.50 लाख रुपये जिंकून घरी परतले. या प्रश्नाचे बरोबर उत्तर होते – पर्याय C. इंडोनेशिया.
शोमध्ये आलेल्या दुसऱ्या स्पर्धक महिला व्यवसायाने शिक्षिका होत्या. त्यांनी सांगितले की त्या किरोडीमल कॉलेजच्या विद्यार्थिनी होत्या, जिथे कधी अमिताभ बच्चन यांनीही शिक्षण घेतले होते. त्यांनी चांगला खेळ केला, पण शेवटी 5 लाख रुपये जिंकून शोमधून बाहेर पडल्या. त्या आपल्या पतीसह ‘केबीसी 17’ मध्ये सहभागी झाल्या होत्या.
