TRENDING:

Anant - Radhika Pre-Wedding Festivities:अनंत-राधिकाच्या ‘प्री-वेडिंग फंक्शन’मध्ये एकत्र येणार तीन खान; तर हे सेलिब्रिटीज वाढवणार शोभा

Last Updated:

गुजरातमधल्या जामनगर इथे एक ते तीन मार्च या कालावधीत होणाऱ्या या ‘प्री वेडिंग’ कार्यक्रमांना अनेक सेलेब्रिटी हजेरी लावणार आहेत हे वेगळं सांगायला नको. नुसती हजेरी लावणार नाहीत तर काही सेलिब्रिटींचे जबरदस्त परफॅार्मन्सही या सोहळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची कन्या राधिका मर्चंट यांच्या शुभविवाहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘प्री वेडिंग’ सोहळ्याचे वेध सध्या अंबानी कुटुंबीयांना लागले आहेत. गुजरातमधल्या जामनगर इथे एक ते तीन मार्च या कालावधीत होणाऱ्या या ‘प्री वेडिंग’ कार्यक्रमांना अनेक सेलेब्रिटी हजेरी लावणार आहेत हे वेगळं सांगायला नको. नुसती हजेरी लावणार नाहीत तर काही सेलिब्रिटींचे जबरदस्त परफॅार्मन्सही या सोहळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहेत.
अनंत-राधिका ‘प्री-वेडिंग फंक्शन’
अनंत-राधिका ‘प्री-वेडिंग फंक्शन’
advertisement

अंबानी कुटुंबातल्या विविध कार्यक्रमांना नेहमीच सर्व क्षेत्रांतल्या सेलेब्रिटींची उपस्थिती असते. सर्वसामान्य नागरिकांसाठी हा अत्यंत कुतूहल आणि आकर्षणाचा विषय असतो. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं ‘प्री वेडिंग’सुद्धा काही अपवाद नसेल. या सोहळ्यासाठी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमीर खान, रजनीकांत असे अनेक बॅालिवूड सुपरस्टार्स सहकुटुंब जामनगरमध्ये दाखल होणार आहेत. सलमान खानसुद्धा या वेळी जामनगरला येणार आहे. अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना ही दोघंही या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. या व्यतिरिक्त अजय देवगण, काजोल, सैफ अली खान, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, रणबीर कपूर, आलिया भट, विकी कौशल, कतरिना कैफ, करण जोहर, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर, करिश्मा कपूर असे सेलेब्रिटी अनंत आणि राधिकाच्या ‘प्री वेडिंग’ला हजेरी लावतील. चंकी पांडे, बोनी कपूर आणि अनिल कपूरही सहकुटुंब जामनगरला येतील अशी माहिती आहे. माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने, आदित्य चोप्रा आणि पत्नी बॉलिवूड स्टार राणी मुखर्जी हेदेखील जामनगरमध्ये येणार असल्याचं कळतंय.

advertisement

रिहाना-अरिजित सिंग ते मराठमोळे अजय-अतुल; अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यात परफॉर्मन्स देणार हे सेलिब्रिटीज

अनंत आणि राधिकाच्या ‘प्री वेडिंग’ला फक्त भारतीयच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातले सेलेब्रिटी आणि कलाकार हजेरी लावणार आहेत. आंतरराष्ट्रीय गायिका रिहाना आणि डेव्हिड ब्लेन हा जगप्रसिद्ध जादूगार हा या निमित्ताने जामनगरमध्ये परफॅार्म करणार आहे. अरिजित सिंग, अजय-अतुल आणि दिलजित दोसांज यांसारख्या भारतीय कलाकारांच्या कॉन्सर्टही या निमित्ताने होणार आहेत. अनंत आणि राधिकाच्या ‘प्री वेडिंग’ला उपस्थित राहणाऱ्या जगभरातल्या पाहुण्यांना भारतीय संस्कृती आणि वारसा यांचे पैलू दाखवण्याचा प्रयत्न अंबानी कुटुंबाकडून करण्यात येणार आहे. गुजरातमधल्या कच्छ आणि लालपूर इथल्या कारागीर महिलांनी बनवलेले पारंपरिक स्कार्फ या पाहुण्यांना दिले जाणार आहेत.

advertisement

19 जानेवारी 2023 रोजी मुंबईतल्या नेत्रदीपक ‘गोल धना’ सोहळ्यात अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा झाला. ‘गोल धना’ सोहळ्यात उपस्थित पाहुण्यांना शब्दशः गूळ आणि धणे वाटले जातात. गुजराती कुटुंबात यालाच साखरपुडा म्हटलं जातं. नियोजित वधू आणि तिचे कुटुंबीय भेटवस्तू आणि मिठाई घेऊन वराच्या घरी येतात. नियोजित वधू वर एकमेकांना अंगठी घालतात आणि दोन्ही कुटुंबांतल्या पाच विवाहित महिलांचे आशीर्वाद घेतात.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Anant - Radhika Pre-Wedding Festivities:अनंत-राधिकाच्या ‘प्री-वेडिंग फंक्शन’मध्ये एकत्र येणार तीन खान; तर हे सेलिब्रिटीज वाढवणार शोभा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल