TRENDING:

अनंत-राधिका यांच्या लग्नात पाहुण्यांना खास आमंत्रण; ड्रेस कोड ते ट्रॅव्हल प्लॅन, असं आहे संपूर्ण प्लानिंग

Last Updated:

सेलिब्रेशनच्या तिन्ही रात्रींसाठी थीम निश्चित केल्या आहेत. पहिल्या दिवशी ‘अ‍ॅन इव्हिनिंग इन एव्हरलँड’ अशी थीम आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे प्री-वेडिंग सोहळा एक ते तीन मार्चदरम्यान गुजरातमधील जामनगरमध्ये होणार आहे. त्यासाठी पाहुण्यांना नऊ पानांचं इव्हेंट गाईड आणि वॉर्डरोब प्लॅनर पाठवण्यात आलं आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या तीन दिवसीय प्री-वेडिंग सोहळ्यात पाहुण्यांनी कोणता पोषाख करावा, त्यांच्या प्रवासाची व्यवस्था कशी असेल, या बाबतची माहिती या गाईडमध्ये देण्यात आली आहे. सर्व पाहुणे एक मार्चला सकाळी 8 ते दुपारी 1 च्या दरम्यान मुंबई किंवा दिल्ली येथून चार्टर्ड फ्लाइटने जामनगरला जातील.
अनंत-राधिका यांच्या लग्नात पाहुण्यांना खास आमंत्रण
अनंत-राधिका यांच्या लग्नात पाहुण्यांना खास आमंत्रण
advertisement

“प्रत्येकाचे सामान सामावून घेण्यासाठी ते नीट पॅक करायची विनंती आम्ही करत आहोत. प्रत्येक व्यक्तीकडे एक हँड लगेज आणि एक होल्ड लगेज असावं. प्रत्येक जोडप्यासाठी एकूण तीन सूटकेस घेता येतील,” असं या इव्हेंट गाइडमध्ये म्हटलंय. "तुम्ही आणखी सामान आणल्यास ते तुम्ही प्रवास करताय त्याच फ्लाईटमध्ये येईल याची आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही, परंतु आम्ही ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू," असंही त्यात नमूद करण्यात आलंय.

advertisement

( हेही वाचा - राधिका आणि अनंत अंबानी Pre Wedding कार्यक्रमासाठी शहारुखची तयारी, प्रॅक्टिसवरुन परत येतानाचा Video ) 

सेलिब्रेशनच्या तिन्ही रात्रींसाठी थीम निश्चित केल्या आहेत. पहिल्या दिवशी ‘अ‍ॅन इव्हिनिंग इन एव्हरलँड’ अशी थीम आहे. या दिवसासाठी ड्रेस कोड "एलिगंट कॉकटेल" ठेवण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी ‘अ वॉक ऑन द वाइल्डसाइड ही थीम असेल आणि ड्रेस कोड असेल ‘जंगल फीव्हर’. या दिवशी होणारे कार्यक्रम जामनगरमधील अंबानींच्या अ‍ॅनिमल रेस्क्यू सेंटरच्या आवारात आयोजित केले जातील. या कार्यक्रमासाठी पाहुण्यांना कंफर्टेबल शूज आणि कपडे घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या दिवशी ‘मेला रो’ साठी ‘सफारी-थीम’असेल. यासाठी ड्रेस कोड "डॅझलिंग देसी रोमान्स" आहे, त्यामुळे पाहुण्यांनी आकर्षक पारंपरिक दक्षिणा आशियाई वस्त्र परिधान करायची आहेत.

advertisement

शेवटच्या दिवशीही दोन कार्यक्रम होतील. पहिला कार्यक्रम ‘टस्कर ट्रेल्स’ असेल, यात "कॅज्युअल चिक" ड्रेस कोड सुचवण्यात आलाय. पाहुण्यांनी अशा पोषाखात जामनगरमधील हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटावा अशी इच्छा आहे. फायनल पार्टीला हस्तक्षर नाव देण्यात आलंय. ही भारतीय सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या वस्त्रांमध्ये पाहुणे या सुंदर संध्याकाळचा आनंद लुटू शकतील.

सर्व पाहुण्यांना एक्स्प्रेस स्टीमिंगसह अनेक प्रकारच्या लॉन्ड्री सेवा पुरवण्यात येतील, असंही गाईडमध्ये म्हटलंय. या शिवाय मेडिकल आणि डाएट्री रिक्वायरमेंट्साठी पाहुणे त्यांना दिलेल्या फोन नंबरवर हॉस्पिटॅलिटी टीमशी संपर्क साधू शकतात, असं म्हटलंय. इतकंच नाही तर हेअर स्टायलिस्ट, साडी ड्रेपर्स आणि मेकअप सर्व्हिसही साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

advertisement

वॉर्डरोब सूचना सविस्तर देण्यात आल्या असूनही पाहुणे त्यांना जे काही कम्फर्टेबल वाटतं, ते परिधान करू शकतात, त्यांनी वार्डरोबचे नियम पाळणं बंधनकारक नाही. “तुम्ही प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घ्यावा आणि आयुष्यभर स्मरणीय राहतील अशा सुंदर आठवणी निर्माण कराव्यात, अशी आमची इच्छा आहे”, असं त्या गाईडमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
अनंत-राधिका यांच्या लग्नात पाहुण्यांना खास आमंत्रण; ड्रेस कोड ते ट्रॅव्हल प्लॅन, असं आहे संपूर्ण प्लानिंग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल