सोशल मीडियावर या क्षणाचा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अरबाज खान आपल्या मुलीला हातात घेऊन रुग्णालयाबाहेर निघताना दिसतोय. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. पापाराझींनी त्याचे स्वागत करताच अरबाजने हसत मान हलवून त्यांचे आभार मानले. त्याचवेळी शूरा मास्क घालून शांतपणे कारमध्ये बसताना दिसली.
'पोटचा मुलगाही माझ्या जवळ येईना' प्रसाद ओकसोबत नेमकं काय झालं? सांगितला वेदनादायी प्रसंग
advertisement
मुलीच्या जन्मानंतर खान कुटुंबात उत्साहाचे वातावरण आहे. सलमान खानही 6 ऑक्टोबर रोजी बाळाला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचला होता. त्याच्याही भेटीचा व्हिडिओ इंटरनेटवर चर्चेत आला.
दरम्यान, अरबाज आणि शूराने डिसेंबर 2023 मध्ये खाजगी समारंभात लग्न केले होते. लग्नानंतर त्यांनी शूराच्या गरोदरपणाची बातमी पूर्णपणे गुप्त ठेवली. काही आठवड्यांपूर्वी अरबाजने दिल्ली टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत या बातमीचा दुजोरा दिला होता. आता त्यांच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे.