TRENDING:

महाराजांचा जयजयकार सुरू असताना शांत बसला; घराबाहेर येताच अरबाजचा माफीनामा, म्हणाला, "मी असा नाहीये..."

Last Updated:

Arbaaz patel apologized to maharashtra : एका मुलाखतीत बोलताना अरबाजने महाराजांच्या जयजयकारा वेळी झालेला प्रकार सांगितला आणि संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरात आठव्या  आठवड्यात अरबाज पटेल घराबाहेर गेला. अरबाजला बिग बॉसच्या घरात आल्यापासूनच ट्रोल करण्यात आलं होतं. मुळचा संभाजीनगरचा असलेला अरबाज घरात जेव्हा छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयजयकार झाला तेव्हा मात्र शांत बसल्याचे पाहायला मिळाले. यावरून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. पहिल्या दिवसापासून त्याला घराबाहेर काढा असे म्हणत प्रेक्षकांनी प्रचंड ट्रोल केले होते. घराबाहेर पडल्यानंतर मात्र अरबाजने त्याच्या या वागण्याची माफी मागितली आहे.
अरबाज पटेल
अरबाज पटेल
advertisement

अरबाजने घराबाहेर पडल्यानंतर त्याचा बिग बॉसचा प्रवास शेअर केला आहे. एका मुलाखतीत बोलताना अरबाजने महाराजांच्या जयजयकारा वेळी झालेला प्रकार सांगितला आणि संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली आहे.

( बिग बॉस मराठी 70 दिवसातच Off Air, समोर आलं विजेत्याचं नाव )

किर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील हे देखील बिग बॉसमध्ये सहभागी झाले होते. एका आठवड्यातच त्यांचा घरातील प्रवास संपला. पुरुषोत्तम दादांनी घराबाहेर जाताना छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयजयकार केला. यावेळी अरबाजच्या तोंडातून जयजयकाराचा एकही शब्द बाहेर आला नाही. त्यामुळे त्याला जबरदस्त ट्रोल करण्यात आले. अरबाज धर्मभेद करतो, संभाजीनगरमध्ये राहून महाराजांप्रती त्याच्या मनात आदर नाही अशा अनेक टीका त्याच्यावर करण्यात आल्या.

advertisement

घडलेल्या प्रकारावर प्रतिक्रिया देत अरबाजने म्हटले आहे, ''तिथे असे काही घडले आहे हे मला माहिती नाही. मी तसा नाहीये. मी जिथे राहतो ती ऐतिहासिक जागा आहे हे सर्वांना माहिती आहे. महाराजांचा इतिहास तिथे घडला आहे. आज त्यांच्यामुळे आपण इथे आहोत".

अरबाज पुढे म्हणाला, "मी ऐकले नाही की तेव्हा तिथे काय चालू आहे. मी रिलीजन घेऊन आलो असतो तर मी मराठी बिग बॉसमध्येच आलो नसतो. मी सांगितले असते की मराठी बिग बॉस आहे, हे असे सगळे होणार तिथे, मी नाही जाणार, असे मी काहीही केलेले नाही".

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पावसाने घेतली पुणे पालिकेची 'परीक्षा', ढगफुटी की आणखी काही? महापौरांनी स्पष्ट सांगितलं!
सर्व पहा

"मला घरातही असे दिसले नाही. मी स्वतः तसा व्यक्ती नाही. रिलीजन या गोष्टीबाबत मी खूप केअरिंग आणि पझेसिव्ह आहे. माझ्याकडून चूक झाली असेल तर मी सगळ्यांची क्षमा मागतो", असं अरबाज म्हणाला.

मराठी बातम्या/मनोरंजन/
महाराजांचा जयजयकार सुरू असताना शांत बसला; घराबाहेर येताच अरबाजचा माफीनामा, म्हणाला, "मी असा नाहीये..."
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल