शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्या 'ओ रोमियो' चित्रपटातील 'हम तो तेरे ही लिए थे' आणि 'आशिकों की कॉलोनी' असे दोन गाणे रिलीज झाले आहेत. आता या दोन गाण्यांनंतर 'इश्क का फिवर' हे तिसरं गाणं रिलीज झालं आहे. 'इश्क का फिवर' हे गाणं अरिजित सिंगने गायलं असून विशाल भारद्वाज यांचे संगीत आणि दिग्गज गीतकार गुलजार यांचे शब्द आहेत. हा असा सुंदर मिलाफ म्युझिक लव्हर्सना गाण्यात पाहायला मिळणार आहे. गाण्याविषयी सांगायचे तर, गाण्याच्या माध्यमातून शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांची फ्रेश जोडी चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
advertisement
दोघांमधील ऑन-स्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना फारच भावली आहे. व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेले हे गाणे प्रेमाचा नवा मंत्र ठरत आहे. गाण्याची सुरुवात अभिनेत्री फरीदा जलाल यांच्या एका प्रभावी संवादाने होते, जे गाण्याला अधिक अर्थपूर्ण बनवते. अलीकडेच अरिजीत सिंगने घोषणा केल्यानंतर विशाल भारद्वाजने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. "अरिजीत... काही दिवसांपूर्वीच आपण एक एकत्रित गाणं गायलं होतं आणि तूच तो व्हिडिओ शूट केला होता. तेव्हा मला माहित नव्हतं की, हे तुझ्यासोबतचं माझं शेवटचं गाणं असेल म्हणून, पण हे unacceptable आहे."
