जामनगर ते महालक्ष्मी रेसकोर्स... लग्नाचा थाटच न्यारा
अर्जुन आणि सानियाच्या लग्नाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात सुरू होती. लग्नापूर्वी जामनगरमध्ये अंबानी कुटुंबाने या जोडीसाठी एक जंगी प्री-वेडिंग पार्टी दिली होती. मंगळवारी महालक्ष्मी रेसकोर्सवर पार पडलेल्या संगीत सोहळ्यात क्रिकेट आणि बॉलिवूडमधील दिग्गजांनी ताल धरला होता.
आज ५ मार्च रोजी, मुंबईच्या हृदयात म्हणजेच दक्षिण मुंबईत हा विवाह सोहळा अत्यंत पारंपरिक पण तितक्याच दिमाखदार पद्धतीने पार पडला.
advertisement
क्रिकेटमधील दिग्गजांची मांदियाळी
या लग्नाला केवळ क्रिकेटच नाही, तर ग्लॅमर विश्वातील अनेक मोठे चेहरे आवर्जून उपस्थित होते. साक्षात बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन आपली पत्नी जया बच्चन यांच्यासह नववधू-वराला आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले. त्यांच्यासोबतच अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांची जोडीही आकर्षणाचं केंद्र ठरली. क्रिकेट विश्वातून सुनील गावस्कर, कपिल देव, महेंद्रसिंग धोनी आणि राहुल द्रविड यांसारखे दिग्गज आपल्या परिवारासह हजर होते.
सागरिका घाटगेचा गोल्डन स्वॅग
दरम्यान, या लग्नसोहळ्यात झहीर खानची पत्नी आणि अभिनेत्री सागरिका घाटगे हिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सागरिकाने या खास प्रसंगासाठी एक अतिशय सुंदर शिमरी गोल्ड साडी नेसली होती.
साध्या पण राजेशाही पद्धतीच्या या साडीवर तिने परिधान केलेलं स्लीव्हलेस ब्लाउज तिच्या सौंदर्याला चार चाँद लावत होतं. फॅशन फॅन्सनी तर सागरिकाच्या या लूकला 'बेस्ट वेडिंग लूक'चं लेबलच लावून टाकलंय.
