मुंबई: उत्तम अभिनेता, गायक, दिग्दर्शक, डान्सर, निर्माते असे अष्टपैलू कलाकार सचिन पिळगावकर यांच्या आवाजात गायलेलं भक्तीगीत प्रदर्शित झालं आहे. हे भक्तीगीत म्हणजे रामायणातील चौपाई आहेत. शेमारू भक्ती युट्यूब चॅनलवर हे प्रदर्शित करण्यात आलं आहे. रामायणातील चौपाईमधील 23 श्लोक सचिन पिळगावकरांनी गायलेले आहेत. त्यापैकी 13 श्लोक व्हिडीओ स्वरुपात प्रदर्शीत करण्यात आले आहेत.
advertisement
22 जानेवारीला अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्याचेच औचित्य साधून सचिन पिळगावकर यांच्या आवाजात रामायणातील चौपाईया युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. संपूर्ण 24 चौपाईया श्लोक ऑडिओ स्वरुपात शेमारूच्या युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आले आहेत.
Ram Mandir: पंतप्रधानांनी केलं हे पुण्याचं काम, विदर्भाच्या बहिणाबाईंची कविता ऐकली का? Video
1975 च्या चित्रपटातील गीत सचिनच्या आवाजात
1975 साली प्रदर्शित झालेल्या 'गीत गाता चल' या चित्रपटातील 'मंगल भवन अमंगल हारी' हे सुंदर भक्तीगीत सचिन पिळगावकर यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. आता थेट 2024 मध्ये हेच भक्तीगीत सचिन पिळगावकरांच्या आवाजात ऐकायला मिळत आहे. त्यानिमित्तानं सचिन यांनी खूप आठवणी सांगितल्या आहेत. तसेच हे भक्तीगीत त्यांच्यापर्यंत कसं आलं याबाबतही ते भरभरून बोलले.
प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद
"प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद म्हणून मला हे भक्तीगीत गाण्याची संधी मिळाली. माझं हे पहिलं भक्तीगीत आहे. त्यामुळे नक्कीच हा देवानं दिलेला प्रसाद आहे," अशा शब्दांत सचिन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संगित क्षेत्रात पुढे येऊ पाहणाऱ्या कलाकारांबाबतही ते भरभरून बोलले. त्यांच्यातल्या काही गोष्टी नक्कीच शिकण्यासारखं असल्याचंही ते म्हणाले. तसेच गाण्याबाबत त्यांच्या लहानपणीच्याही खूप आठवणी, किस्से त्यांनी सांगितले आहेत.