TRENDING:

'बायको पाहिजे' म्हणणारा तो तरुण कोण? अखेर नाव आलं समोर, या मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Last Updated:

मुंबई लोकल आणि उन्हातान्हाचा रस्त्यावर बायको पाहिजेचं पोस्टर घेऊन फिरणाऱ्या त्या तरुणाची स्टोरी अखेर समोर आली आहे. कोण आहे हा तरूण?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
काही दिवसांआधी मुंबईच्या रस्त्यांवर, लोकलमध्ये बायको पाहिजे म्हणत एका तरुणाचे फोटो व्हायरल झाले होते. तो तरुण कोण होता? असा हातात बोर्ड घेऊन बायको का शोधत होता असे अनेक प्रश्न सर्वांना पडले होते. अखेर या तरुणाचं नाव समोर आलं आहे. धनराज धोंडीराज दांगट असं त्याचं नाव आहे.  तो खऱ्या आयुष्यात नाही मालिकेतील भूमिका साकारत होता. स्टार प्रवाहवर येणाऱ्या नव्या मालिकेत तो दिसणार आहे.
News18
News18
advertisement

स्टार प्रवाह वाहिनी ‘बाई तुझा आशीर्वाद’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. घर चालवणारी, जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणारी, नात्यांमध्ये समतोल साधणारी, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी झगडणारी आणि घराला पूर्णत्व देणारी स्त्री म्हणजेच ‘बाई’ या मालिकेच्या केंद्रस्थानी आहे. ज्या घराला बाईच्या असण्याचीच सवय नाही, अशा पूर्णपणे पुरुषप्रधान घरात अवनीचं आगमन होतं आणि तिथूनच सुरू होतो नात्यांचा नवा प्रवास.

advertisement

( Marathi Actress : मराठी TV ची एकेकाळची आघाडीची नायिका, मग झाली खलनायिका; आता थेट साकारणार आईची भूमिका )

तिच्या येण्याने त्या घरात फक्त एक व्यक्ती नाही, तर समज, संवाद, आपुलकी आणि घरपण येतं. ‘बाई तुझा आशीर्वाद’ ही मालिका ठामपणे सांगते की बाई म्हणजे केवळ घर चालवणारी व्यक्ती नाही, तर ती घराला घर बनवणारी शक्ती आहे.

advertisement

स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेविषयी बोलताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, "घराला घरपण एका बाईमुळे येतं. ती खऱ्या अर्थाने घराचं नंदनवन करते. तिचं अस्तित्व हा तिचा आशीर्वाद असतो. अश्या बाईच्या आशीर्वादाला मुकलेल्या घराला, कुटुंबाला पुन्हा एक बाई कशी जोडते याची गोष्ट मांडण्याचा प्रयत्न या मालिकेतून करणार आहोत. मला खात्री आहे ही मालिका प्रेक्षकांना नक्की आवडेल."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाराष्ट्रातील असं मंदिर, जिथं 90 वर्षांपासून सुरू आहे अखंड दिवा, इतिहास तुम्हाला माहितीये का?
सर्व पहा

या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे आणि सुनील तावडे यांच्यासह अक्षता अनिता प्रमोद, अर्णव वॅरिअर ( धनराज धोंडीराज दांगट) हे लीड रोलमध्ये आहेत. तसंच पुष्कर सराड, सतीश तांदळे, राघव वर्तक असे अनेक नवोदित कलाकार या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती निखिल शेठ आणि विनोद लव्हेकर यांच्या पोतडी या निर्मिती संस्थेने केली असून विनोद लव्हेकरच या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. अमोल पाटील या मालिकेच्या लेखनाची जबाबदारी पार पाडणार आहेत. बाई तुझा आशीर्वाद ही मालिका 30 मार्चपासून रात्री 9 वाजता टेलिकास्ट होणार आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
'बायको पाहिजे' म्हणणारा तो तरुण कोण? अखेर नाव आलं समोर, या मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल