भक्तीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "आई तु आहेस माझ्या सोबत. तुझा हा हसरा चेहराच सगळ्यांच्या लक्षात राहील.. 22 फेब्रुवारी 2026 ला आई ला देवाज्ञा झाली. तिचं आवडीच स्वयंपाकाच काम करत असताना घरी आलेल्या पाहुण्यांच स्वागत करुन हसत हसत कोणाला कसलाही त्रास न देता अचानक गेली. अजून ही खरं वाटत नाही आहे मला. माझे आई बाबा दोघेही असेच गेले. अचानक खुप वाईट वाटत आहे. पण ते दोघंही आहेत माझ्याबरोबर."
advertisement
पोस्टमधून हे कळतंय की भक्तीच्या सासूबाईंच निधन झालं आहे. भक्तीचं तिच्या सासूबाईंसोबत आईसारखं नातं होतं. त्यांच्या निधनाने तिच्या मोठा आघात झाला आहे. भक्तीच्या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत तिचं सांत्वन केलं आहे. तिच्या सासूबाईंना श्रद्धांजली वाहिली आहे.
भक्तीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास ती सध्या 'तुझ्या सोबतीने' या मालिकेत काम करतेय. त्याआधी ती 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत दिसली होती. तिनं देवकीची रिप्लेसमेंट केली होती. भक्ती गेली अनेक वर्ष मराठी नाटक, सिनेमा आणि मालिकांमध्ये काम करतेय. प्रसिद्ध अभिनेता निखिल रत्नपारखीची ती पत्नी आहे.
