मुंबई: अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या घरात लवकरच नवा पाहुणा येणार असल्याची बातमी समोर येत आहे. या जोडप्याने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कतरिना गर्भवती असून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बाळाचा जन्म होण्याची शक्यता आहे.
advertisement
गेल्या अनेक महिन्यांपासून कतरिनाच्या गरोदरपणाच्या चर्चा सुरू होत्या. परंतु या जोडप्याने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.
या चर्चांनंतर कतरिनाने सार्वजनिक कार्यक्रमांपासून स्वतःला दूर ठेवले होते. याबाबत एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार बाळाच्या जन्मानंतर ती दीर्घकाळ मॅटर्निटी ब्रेक घेणार आहे. सूत्रांनी सांगितले की, तिला स्वतः एक चांगल्या आईची जबाबदारी पार पाडायची आहे.
विकीची प्रतिक्रिया
'बॅड न्यूज' (Bad Newz) चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी विकी कौशलला कतरिनाच्या गरोदरपणाबद्दल विचारले असता, तो म्हणाला होता की- चांगल्या बातमीबद्दल (गरोदरपणाबद्दल) बोलायचे झाल्यास, आम्हाला ती तुमच्यासोबत शेअर करताना खूप आनंद होईल. पण सध्या या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. सध्या 'बॅड न्यूज'चा आनंद घ्या, जेव्हा 'गुड न्यूज' (चांगली बातमी) येईल. तेव्हा आम्ही तुमच्यासोबत नक्कीच शेअर करू.
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी 2021 मध्ये राजस्थानमधील सिक्स सेन्सेस फोर्ट बरवारा येथे विवाह केला होता. या दोघांच्या लग्नात केवळ जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. हे दोघेही सोशल मीडियावर खास प्रसंगी त्यांचे एकत्र फोटो शेअर करत असतात.
विकी कौशल अलीकडेच 'छावा' (Chhaava) या ऐतिहासिक चित्रपटात दिसला. तर कतरिना कैफ 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) या चित्रपटात विजय सेतुपतीसोबत दिसली होती.