विकी जैन सीझन 17 चा मास्टरमाइंड आहे. त्याच्या आणि अंकिताच्या सततच्या भांडणांमुळेही खूप चर्चेत असतात. विकीसोबत भांडण झाल्यावर अंकिता अनेकदा रडताना दिसली. आता नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये, पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री अंकिताने सह-स्पर्धक मुनव्वर फारुकी जवळ 'विकी बद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.
advertisement
एपिसोडमध्ये अंकिता मुनावर फारुकीसोबत बागेत फिरताना दिसत आहे. यादरम्यान अंकिता लोखंडे आणि मुनव्वर यांच्या लक्षात आले की विकी जैन रिंकू धवनसोबत व्यस्त आहे. यावर, विक्कीकडे बघत अंकिता म्हणते, "विकी, हा एक किडा आहे, हा मला खूप त्रास देतोय, मी याला बाहेर काढून फेकून देईन.' असं ती रागात म्हणाली.
अंकिता पुढे म्हणते, ''त्याला काहीतरी विषय सापडला ना, की तो इतकं बोलतो'. विकी आणि माझं घरी कधी भांडण झालं ना मी त्यावेळी विकीचा आवाजही सहन करू शकत नाही. खूप तत्वज्ञान शिकवतो तो.'' असं अंकिता म्हणाली आहे.
बिग बॉसच्या घरात विकी जैन आणि अंकिता यांच्यात अनेक भांडणं झाले आहेत. विकी नेहमी अंकितावर ओरडताना दिसतो. नॅशनल टीव्हीवरही विकीने अंकिताला फटकारले आहे. त्याने तिला 'तू मला आयुष्यात काही देऊ शकली नाहीस, आता शांतता तरी मला लाभू दे' असं म्हणत तिचा अपमान केला होता. यानंतर त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं होतं. सोबतच सलमान खाननेही विकीला फटकारलं होतं.
अंकिताने ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैवाहिक आयुष्याचा खुलासा केला. बिग बॉस 17 मध्ये जाण्यापूर्वी तिने सांगितले होते की, ती आणि विकी एकमेकांची कंपनी एन्जॉय करतात. बिग बॉसच्या घरातही हेच पाहायला मिळणार आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. अंकिता आणि विकी एकमेकांशी फक्त भांडताना दिसत आहेत. त्यामुळे दोघांचा बिग बॉसच्या घरात कपल म्हणून जाण्याचा निर्णय चुकीचा होता असं चाहते म्हणत आहेत.
