निक्की तांबोळी पोस्ट
निक्की तांबोळीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत प्रणित मोरेला सपोर्ट केला आहे. निक्कीने पहिल्यांदा बसीर अलीला झापलं. म्हणाली, "कोणाच्या कलरवरुन कमेंट करणं हे खूप लाजिरवाणं आहे. त्यानंतर तिने प्रणित मोरेला सपोर्ट करत म्हटलं, प्रणित सर्व महाराष्ट्राची लोक संपूर्ण देशातील लोकं तुझ्यासोबत आहेत. आपला मराठी माणूस आहे सर्वांनी सपोर्ट करा. तुझ्यावर अभिमान आहे."
advertisement
वीकेंड प्लॅन फिक्स! ओटीटीवर हॉरर, थ्रिलर, सस्पेन्सचा तडका, पॉपकॉर्नसह तयार राहा
नेमकं प्रकरण काय?
या भांडणाची सुरुवात गायक अमाल मलिक याच्यामुळे झाली. अमाल हा प्रणितला त्याच्या पाठीमागे 'झझू' (Zazu) (द लायन किंग चित्रपटातील एक पात्र जो फक्त मेसेज देतो) या नावाने चिडवत होता. जेव्हा प्रणितला ही गोष्ट कळली, तेव्हा तो अमालवर भडकला. अमाल आणि प्रणित यांच्यात जोरदार शाब्दिक वाद सुरू झाला. याच वादात बसीर अलीने उडी घेतली आणि भांडण अधिक वाढवले.
nikki tamboli
दरम्यान, या भांडणामुळे घरात काही वेळ वातावरण ताणलेले दिसले. काही सदस्य प्रणितच्या समर्थनार्थ उभे राहिले, तर काही बसीरच्या बाजूने होतील, अशी चर्चा रंगली. पण घरातील मॉनिटरिंग आणि नियमांचे पालन करणाऱ्या टीमने परिस्थितीवर नियंत्रण ठेवले.