विकेंड का वारची सुरुवात क्रिकेटर झूलन गोस्वामी आणि अंजुम चोप्रा यांच्या एन्ट्रीने झाली. सलमानने दोगांना वल्डकपसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सलमान खानने अभिषेकवर तान्या मित्तलबरोबर फ्लर्ट करण्याचा आरोप केला. अभिषेकची चांगलीच शाळा घेतली. शेवटी विकेंड का वारला दोन स्पर्धक घरातून बाहेर गेले.
( फिनाले आधीच Bigg Boss 19 च्या विनरचं नाव लीक, ही घ्या TOP 5 फायनलिस्टची लीस्ट )
advertisement
या आठवड्यात बिग बॉस 19मध्ये डबल इविक्शन करण्यात आलं. मागील आठवड्यात गौरव खन्ना, अभिषेक बजाज, अनशूर कौर, फरहाना भट्ट आणि नीलम गिरी हे स्पर्धक नॉमिनेट होते. गौरव आणि फरहाना आधीच सेफ असल्याचं सलमान खानने सांगितलं. त्यानंतर सलमान खान प्रणितला एक स्पेशल पावर दिली. त्याला एलिमिनेशनपासून वाचवण्यासाठी एका स्पर्धकाचे नाव घेण्यास सांगितलं. त्याने अशनूरचं नाव घेतलं त्यामुळे तो शेफ झाला. अभिषेक आणि नीलम या आठवड्यातून घराबाहेर गेले.
दरम्यान आऊट झाल्यानंतर नीलम गिरी अजिबात रडली नाही. ती शेवटी अरमानला आय लव्ह यू म्हणून बाहेर गेली. तर अभिषेक आऊट झाल्यानंतर अशनूर ढसाढसा रडला. तू परत येशील, तुला सीक्रेट रूममध्ये ठेवणार असं काही होईल. तर अशनूर त्याला म्हणाला, मी ट्रॉफी जिंकली नाही म्हणून काय झालं, सगळ्यांची मनं तर जिंकली.
