Bigg Boss 19 : 'बिग बॉस 19'च्या घरात आज 'वीकेंड का वार' पार पडणार आहे. बॉलिवूडचा भाईजान आणि बिग बॉसचा होस्ट सलमान खान गेल्या दोन आठवड्यांबाबत घरातील सदस्यांची चांगलीच शाळा घेताना दिसून येईल. 'बिग बॉस 19'चा नवा प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये सलमान या पर्वातील दमदार सदस्यांपैकी एक असलेल्या गौरव खन्नाची शाळा घेताना दिसत आहे. सोशल मीडियावरील रिपोर्ट्सनुसार, असा दावा केला जात आहे की, गौरव खन्ना या आठवड्यात घराबाहेर पडू अशतो. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
advertisement
प्रोमोने वाढली उत्सुकता
'बिग बॉस 19'चा नवा प्रोमो आज शनिवारी आऊट केला आहे. निर्मात्यांनी या प्रोमोमध्ये सलमान खानची झलक दाखवली आहे. त्याचबरोबर या प्रोमोमध्ये गौरव खन्ना आणि बसीर अली यांच्यातील भांडणही स्पष्टपणे दाखवण्यात आलं आहे. बसीर अली गौरवला ओरडून विचारतोय की,"चार आठवड्यांत तुम्ही काय करून दाखवलं?". त्यावर गौरव खन्ना देखील उत्तर देताना दिसतो की,"तो आपला गेम आपल्या पद्धतीने खेळू इच्छितो." प्रोमोमध्ये दोघांमधील झटापट पाहायला मिळतेय. गौरवच्या चेहऱ्यावर क्रॉसचं मार्कदेखील दिसून येत आहे. त्यामुळे आता गौरव खन्ना खरोखरचं 'बिग बॉस 19'चा निरोप घेणार का हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना 'वीकेंड का वार' पाहायला मिळणार आहे.
Rinku Rajguru : मुंबईत रिंकूला वाटतंय एकटं-एकटं, मग जाते 'त्याच्या' भेटीला; स्वत:च सांगितलं
'बिग बॉस 19'च्या मागील आठवड्यात सलमान खान वीकेंड का वार होस्ट करताना दिसला नव्हता. त्यामुळे फराह खानने सलमानची जागा घेतली होती. सलमान खान आपल्या आगामी 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटाच्या शूटिंगसाठी परदेशात गेला होता.
'हे' पाच सदस्य नॉमिनेटेड
'बिग बॉस 19'च्या या आठवड्यातील घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी अभिषेक बजाज, अशनूर कौर, नेहल चुडासमा, बसीर अली आणि प्रणीत मोरे हे पाच सदस्य नॉमिनेट झाले आहेत. वीकेंडचा वार हा घरातील प्रत्येक सदस्यासाठी नेहमीच कठीण असतो.
अभिषेक बजाज नवा कॅप्टन
'बिग बॉस 19'च्या घराचा पहिला कॅप्टन होण्याचा मान अमाल मलिकला मिळाला होता. त्याच्यानंतर आता अभिषेक बजाज 'बिग बॉस 19'चा नवा कॅप्टन बनला आहे. अभिषेकने कॅप्टनची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत घरातील सर्व सदस्यांना कामांचं वाटप केलं आहे. यावेळी गौरव खन्ना आणि बसीर अली यांच्यात वाद झालेले पाहायला मिळाले.