आठवड्याच्या चावडीऐवजी यंदा भाऊचा धक्का पहायला मिळणार आहे. होस्ट रितेश देशमुख स्पर्धकांना भाऊचा धक्का दाखवणार आहे. पहिल्यांदा होस्ट महेश मांजरेकर घरात स्पर्धकांची चावडी घ्यायचे मात्र होस्ट बदलल्यामुळे बऱ्याच गोष्टीही बदल्या आहेत. आता चावडी ऐवजी भाऊचा धक्का बसणार. त्यामुळे यंदा रितेश देशमुख स्पर्धकांचा क्लास कसा घेणार? त्याचं स्पर्धक किती ऐकणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
advertisement
Sana Maqbool: बिग बॉस OTT 3 जिंकताच सना मकबूलच्या बॉयफ्रेंडची रिॲक्शन आली समोर, लग्नावरही बोलला!
रितेश देशमुखच्या स्टाइलने आता विकेंडला स्पर्धकांचा क्लास लागणार आहे. रितेश देशमुख आणि स्पर्धक विकेंडला काय करणार? कोण ओरडा खाणार? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. आज शनिवारी पहिला भाऊचा धक्का पहायला मिळणार आहे. या धक्क्याने कोणत्या स्पर्धकाला धक्का बसणार रितेश भाऊ कोणाला लय भारी धक्का मारणार हे उत्कंठा वाढवणारं आहे.
दरम्यान, यंदाचा सीझन नव्या होस्टसह नव्या फॉरमॅटमध्ये आहे. घरात वेगवेगळ्या कॅटेगरीतले स्पर्धक आले आहेत. सर्वच एकापेक्षा एक वरचढ आहे. अभिनेत्री वर्षा उसगांवकर, अभिनेता निखिल दामले, कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर, विनोदवीर पंढरीनाथ कांबळे, अभिनेत्री योगिता चव्हाण, अभिनेत्री जान्हवी किल्लेकर, गायक अभिजित सावंत, छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दराडे, मुंबईची बार्बी इराना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण या स्पर्धकांनी बिग बॉस मराठीच्या घरात यंदा एण्ट्री घेतलीय. मात्र स्पर्धक प्रेक्षकांच्या मनात एण्ट्री करुन शकतील का? कोणाला प्रेम मिळणार आणि कोण ट्रोल होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.