Sana Maqbool: बिग बॉस OTT 3 जिंकताच सना मकबूलच्या बॉयफ्रेंडची रिॲक्शन आली समोर, लग्नावरही बोलला!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
बिग बॉस ओटीटीची ट्रॉफी जिंकताच सनावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच सना मकबूलच्या बॉयफ्रेंडची रिॲक्शन समोर आलीय.
मुंबई : अखेर बिग बॉस OTT 3 चा विनर समोर आलाय. यंदाचं विजेतेपद सना मकबूलच्या नावी झालं. सनाला केवळ चकचकीत ट्रॉफीच मिळाली नाही तर त्यासोबतच तिला 25 लाख रुपयांचं बक्षीसही देण्यात आलंय. बिग बॉस ओटीटीची ट्रॉफी जिंकताच सनावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच सना मकबूलच्या बॉयफ्रेंडची रिॲक्शन समोर आलीय. सोबत तो सनासोबत लग्नाविषयीही बोलला. दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सना मकबूल बिग बॉस ओटीटी सीझन 3 ट्रॉफी जिंकता तिच्या बॉयफ्रेंड श्रीकांत बुरेदीची रिॲक्शन समोर आलीय. त्याच्या रिॲक्शनचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
बॉयफ्रेंड श्रीकांत बुरेदी बिग बॉस OTT 3 च्या ग्रँड फिनालेमध्ये सना मकबूलला पाठिंबा देण्यासाठी आला होता. सना ट्रॉफी जिंकताच तो खूप आनंदी आहे. श्रीकांतने सांगितलं की, सनाच्या विजयाने तो खूप खूप आनंदी आहे. तो म्हणाला सर्वांचे खूप आभार. लग्नाविषयी विचारल्यावर तो म्हणाला 'होईल...वेळ लागेल पण होईल.'
advertisement
advertisement
दरम्यान, सनाच्या विजयावर श्रीकांत बुरेदी आणि तिचे चाहतेही खूप आनंद असल्याचं दिसत आहे. सनासोबत टॉप 3 मध्ये रणवीर शौरी आणि नेझी पोहचले होते. पण दोघांना हरवत सनाने विजेतेपद जिंकलं आहे. सुरुवातीपासूनच ती एकदम आत्मविश्वासानं खेळत होती आणि तिच्या विचारांवर क्लिअर होती. त्यामुळे स्पष्ट मताने दिला ट्रॉफी जिंकून दिली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 03, 2024 8:54 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Sana Maqbool: बिग बॉस OTT 3 जिंकताच सना मकबूलच्या बॉयफ्रेंडची रिॲक्शन आली समोर, लग्नावरही बोलला!


