बाबो! बिग बॉसच्या घरात मराठीचे धडे घेताना इरिना बोलली असं काही; सर्व कंटेस्टनी तोंडाला लावला हात

Last Updated:

बिग बॉसच्या घरात महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील एक सदस्य आहे. त्या सगळ्यांकडून इरिनानं मराठीचं ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली आहे.

बिग बॉसच्या घरात इरिना घेतेय मराठीचे धडे
बिग बॉसच्या घरात इरिना घेतेय मराठीचे धडे
मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरात एक सौ एक दमदार स्पर्धक आले आहेत. एकूण16 स्पर्धकांपैकी एका स्पर्धकानं सर्वांचं लक्ष वेधलं ती म्हणजे परदेसी गर्ल इरिना रूडाकोवा. परदेसी गर्ल असली तरी तिला भारताविषयी आणि मराठी भाषेविषयी खूप जिव्हाळा आहे. इरिना अनेक वर्ष मुंबईत राहतेय. त्यामुळे तिला इथली भाषा कळते. मराठी भाषा कळत असली तरी बोलताना तिला काही अडथळे येतात. बिग बॉसच्या घरात महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील एक सदस्य आहे. त्या सगळ्यांकडून इरिनानं ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली आहे. मराठीचे धडे घेताना इरिना असं काही बोलून गेली की घरातील सगळ्याच सदस्यांनी तोंडावर हात लावला आहे.
परदेसी गर्ल इरिनाची मराठी भाषा शिकण्याची धडपड, तिचा मराठी भाषेतला गोडवा घरात वेळोवेळी पाहायला मिळतोय. 'बिग बॉस'च्या प्रेक्षकांना इरिनाचा हा अंदाज प्रचंड आवडल्याचं पाहायला मिळतंय. बिग बॉसचा नवा प्रोमो समोर आला आहे ज्यात घरातील सगळेच तिला मराठी शिकवत आहेत.
advertisement
प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय, अंकिता इरिनाला मालवणी भाषा शिकवताना दिसत आहे. अंकिता इरिनाला शिकवतेय,"माका सांगू नको". त्यानंतर इरिनादेखील "माका सांगू नको" म्हणते. अंकितानंतर इरिना म्हणते,"राम कृष्ण हरी". इरिनाच्या मराठी शिकण्याच्या धडपडीवर घरातील इतर सदस्य तिचं कौतुक करताना दिसत आहेत.
त्यानंतर इरिना वैभव चव्हाणला ती "तुम्ही कसे आहात हे विचारते". त्यावर वैभव म्हणतो,"मी एकदम मस्त". त्यानंतर इरिना सूरजकडे जाते. सूरज इरिनाला त्याच्यासारखा डान्स करायला शिकवतो. इरिना सूरजला बकरी म्हणतो. . त्यावर सूरज तिला "मी शेर आहे" असं म्हणतो. त्यावर इरिना त्याला "मी किंग कोब्रा आहे" असं म्हणते.
advertisement
advertisement
घरातील सगळ्या सदस्यांकडून मराठीचे धडे घेत घेत इरिना थेट डिपी म्हणजेच धनंजय पोवारकडे पोहोचते. धनंजय तिला कोल्हापूरी भाषा शिकवतो. तो पहिलं वाक्य म्हणतो, सूपला शॉट. इरिनाही फुल जोशात म्हणते, सूपला शॉट. त्यानंतर डिपी कुठं चाललायस? हे दुसरं वाक्य तिला शिकवतो. ते बोलताना इरिना गडबड करते आणि म्हणते, कुत्रा चाललायस. इरिनाचं हे वाक्य डिपी पोट दुखेपर्यंत हसतो.
मराठी बातम्या/मनोरंजन/
बाबो! बिग बॉसच्या घरात मराठीचे धडे घेताना इरिना बोलली असं काही; सर्व कंटेस्टनी तोंडाला लावला हात
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement