TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : राखीपाठोपाठ अभिजीत बिचुकलेही पुन्हा 'बिग बॉस'च्या घरात, Wild Card Entry? Watch Video

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 Abhijeet Bichukale : बिग बॉस मराठी 6 चा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. जो पाहिल्यावर आणखी एका नवीन वाइल्ड कार्ड एंट्री होणार असल्याची चर्चा आहे आणि अभिजीत बिचुकलेंचं नाव समोर येत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बिग बॉस मराठी सहाव्या सीझनमध्ये चौथ्या आठवड्यानंतर वाइल्डा कार्ड एंट्री झाली.  राखी सावंत पहिली वाइल्ड कार्ड सदस्य. राखीला बिग बॉसच्या घरात येऊन 2 आठवडे झाले आहेत. आता सहाव्या आठवड्यानंतर आणखी एक वाइल्ड कार्ड एंट्रीची चर्चा होते आहे.
फाइल फोटो
फाइल फोटो
advertisement

बिग बॉस मराठी 6 चा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. जो पाहिल्यावर आणखी एका नवीन वाइल्ड कार्ड एंट्री होणार असल्याची चर्चा आहे. प्रोमोमध्ये म्हटलं आहे. प्रोमोत बिग बॉसच्या घरात महाराष्ट्राचं तुफान येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

तिघांवर टांगती तलवार! पण वेगळाच सदस्य Bigg Boss Marathi 6 च्या घरातून 'आऊट'? एव्हिक्शनआधीच समजलं

advertisement

'अस्सल स्वॅग, कडक वाइब्स, लूक झकास, मराठमोळा खास, फक्त तुमच्यासाठी, लवकरच...', असं या प्रोमोमध्ये म्हटलं आहे.महाराष्ट्राच्या मातीतलं, अस्सल मराठमोळं! येतंय महाराष्ट्राचं तुफान लवकरच… असं पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहित खाली बिग बॉस मराठीचा उल्लेख आहे.

हा प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षक, नेटिझन्सनी नवीन वाइल्ड एंट्री आणि तो सदस्य कोण असू शकतो, याचाही अंदाज बांधला आहे. बहुतेकांनी अभिजीत बिचुकलेंचं नाव घेतलं आहे.

advertisement

अभिजीत बिचुकले एक राजकीय नेता.  अभिजीत बिचुकले नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. सिर्फ 'नामही काफी हैं' म्हणत ते कायमच चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांच्या गाण्यांमुळे त्यांना विशेष पसंती मिळाली. बिचुकलेंनी आजवर अनेक निवडणुका लढवल्या असून त्याला यश आलेलं नाही. बिचुकलेंना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. अनेकदा त्यांनी याबद्दल भाष्य केलं आहे.

advertisement

बिचुकले यांनी डॉक्टरेटही मिळवली आहे. दिल्लीच्या मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटीतर्फे त्यांना डॉक्टर ही पदवी देण्यात आलीये. आजवरचं आर्ट आणि नाट्य क्षेत्रातील कार्य पाहून ही पदवी दिली असल्याचं बिचुकलेंनी सांगितलं होतं.

Bigg Boss Marathi 6 : 'भाऊचा धक्का'लाच प्रेक्षकांचा धक्का! म्हणाले 'चुकला', रितेश देशमुखवर नाराज

बिचुकले याआधी हिंदी आणि मराठी दोन्ही बिग बॉसमध्ये दिसले आहेत. बिग बॉस 15 मध्ये त्यांनी हिंदी बिग बॉसही दणाणून सोडला होता. बिग बॉस मराठी 2 मध्येही ते दिसले. बिग बॉस मराठीमध्ये ते सगळ्याच जास्त चर्चेत राहिलेले सदस्य होते. आता ते बिग बॉस मराठी 6 मध्ये येणार असल्याची फक्त चर्चा आहे, ती कितपत खरी ठरते पाहुयात.

बिग बॉस मराठी 6 ची पहिली वाइल्ड कार्ड एंट्री राखी सावंत

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गाडगे बाबाचं पुस्तक वाचलं, आयुष्य बदललं, अवलिया जिथे जातो तिथे स्वच्छता करतो!
सर्व पहा

राखी सावंत ही बिग बॉस मराठी 6 मधील पहिली वाइल्ड कार्ड सदस्य. 'नागिण' अवतारात तिने घरात एंट्री केली. पहिल्याच दिवशी घरातील सगळ्या सदस्यांना सळो की पळो करून सोडलं. पहिल्या दिवसापासून तिचा ड्रामा सुरूच आहे. प्रत्येक सदस्याच्या नाकात तिने दम केला आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : राखीपाठोपाठ अभिजीत बिचुकलेही पुन्हा 'बिग बॉस'च्या घरात, Wild Card Entry? Watch Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल