रुचिताने दिपालीवर गंभीर आरोप केला. ज्यामुळे दिपाली शॉक झाली. रुचिताचा आरोप ऐकून तिला धक्काच बसतो. तिच्या रागाचा पारा चढला आणि तिचा संयमही सुटला आहे.
दीपाली आणि रुचिता यांच्यातील संवाद
रुचिता : हिने असं स्टेटमेंट सगळ्यांना सांगितलं की रुचिता तू RB ला touch केलं'.
दीपाली : मी तुझ्यावर बोललेली नाहीये! मी नव्हते ती! मी नव्हते ती! मी नव्हते ती!
advertisement
रुचिता : अंगावर चढू नकोस ...
दीपाली : तू बोट खाली कर ... एक मरेन
रुचिता : हा चल मार!
रुचिता आणि दिपालीतील हा शाब्दिक वाद मारहाणीपर्यंत पोहोचते. प्रोमोच्या शेवटी किंकाळी ऐकू येते. दिपालीने रुचिताला मारलं असं दिसतं.
या भांडणामुळे घरातील इतर सदस्यही अवाक झाले आहेत. त्यांना नक्की कोणाची बाजू घ्यावी हे कळेनासे झालं आहे. बिग बॉसच्या घरात दररोज नवीन समीकरणं बदलत असताना, दिपाली आणि रुचिता यांच्यातील हा नवा वाद घराचं वातावरण नक्कीच बदलून टाकणार आहे.
