TRENDING:

अजिबात टच करायचं नाही, अजिबात टच करायचं नाही! ...अन् ऐकू आली किंकाळी; Bigg Boss Marathi 6 च्या घरातील वातावरण गंभीर

Last Updated:

Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठी 6 च्या घरातील वातावरण अधिकच पेटत चाललं आहे. वाद अगदी टोकाला पोहोचले आहेत. आता अशी परिस्थिती आहे की घरातील वातावरण अगदी गंभीर झाल्याचं दिसतं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वादापासून सुरू झालेला बिग बॉस मराठी 6 चा सीझन अधिकच तापत चालला आहे. बिग बॉसच्या घरातील वातावरण पेटत चाललं आहे. वाद अगदी टोकाला पोहोचले आहेत. आता नवा प्रोमो समोर आला आहे, ज्यात बिग बॉसच्या घरातील वातावरण अगदी गंभीर झाल्याचं दिसतं आहे. ज्याच्या शेवटी किंकाळीही ऐकू येतं. त्यामुळे बिग बॉसच्या प्रेक्षकांनाही टेन्शन आलं आहे.
News18
News18
advertisement

बिग बॉसच्या नव्या एपिसोडच्या प्रोमोमध्ये दिपाली सय्यद आणि रुचिता जामदार आपसात भिडलेल्या दिसत आहेत.  रुचिता दिपालीवर एक आरोप करते, ज्यामुळे दिपाली शॉक होते. दिपाली रुचिताला वारंवार सांगते, मी तुझ्याबाबत बोलले नव्हते, मी तुझ्याबद्दल बोलले नव्हते, मी नव्हते ती, मी नव्हते ती, ती होती. पण रुचिता शांत बसत नाही ती वाद घालतच राहते. दिपालीला बोट दाखवत आवाज करू नको असं सांगते. दिपाली तिला तू बोट खाली कर असं म्हणते.

advertisement

Dhurandhar 2 : 'धुरंधर 2' मध्ये भाईजानची एंट्री? टिझर रिलीजनंतर सलमान खानचा सेटवरचा Photo Viral

दिपाली जवळ येत रुचिताला बोट खाली कर असं सांगते, तेव्हा रुचिता अजिबात टच करू नको, अजिबात टच करू नको असं म्हणताना दिसते. दिपाली तिला बोट खाली कर नाहीतर एक मारेन असं म्हणते, त्यावर रुचिता हा चल मार असं सांगते. शेवटी फक्त एक किंकाळी ऐकू येते.

advertisement

या दोघींमधील वादाचं कारण एकंदर राकेश असल्याचं समजचं आहे. दिपालीने रुचिता आणि राकेशबाबत काही विधान केल्याचं रुचिता म्हणते.

रुचिता आणि राकेशमध्येही वाद

दरम्यान याआधी रुचिता आणि राकेशमध्ये जोराचं भांडण झालं आहे. पापड टास्कवेळी दोघं भिडले. दोघांनीही एकमेकांना फालतू म्हटलं. शेवटी राकेश एक तर ही या घरात राहिल किंवा मी, असं बिग बॉसला सांगताना दिसतो.

advertisement

Dhurandhar 2 : 'धुरंधर 2' मध्ये भाईजानची एंट्री? टिझर रिलीजनंतर सलमान खानचा सेटवरचा Photo Viral

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोलापूर कांदा मार्केटमधून मोठं अपडेट, आवक घटली, क्विंटलला किती मिळाला भाव?
सर्व पहा

आता रुचिताचा राकेश, दिपालीसोबतचा हा वाद कुठंवर पोहचणार? या भांडणामुळे आता बिग बॉसच्या घरातील ठिगण्या पेटणार का? हे आजच्या भागात समजेल.

मराठी बातम्या/मनोरंजन/
अजिबात टच करायचं नाही, अजिबात टच करायचं नाही! ...अन् ऐकू आली किंकाळी; Bigg Boss Marathi 6 च्या घरातील वातावरण गंभीर
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल