बिग बॉस मराठी 6 च्या घरात गेल्या तीन आठवड्यांत जे दिसलं नाही ते आता चौथ्या आठवड्यात दिसतं आहे आणि हा जोडीची बेडी या टास्कचाच चमत्कार आहे, असंच म्हणावं लागेल. या आठवड्यात बिग बॉसने स्पर्धकांच्या जोड्या बनवल्या आहेत. ज्यात आजवर एकमेकांना भिडणाऱ्या दोन शत्रू स्पर्धकांना बिग बॉसने एकाच बेडीत बांधलं आहे. आठवडाभर त्यांना असंच बेडीत राहायचं आहे आणि ही बेडी आता जादू करताना दिसते आहे.
advertisement
ए मारतेस काय, देऊ काय! Bigg Boss Marathi 6 च्या घरात फुल्ल ऑन राडा; पापडासाठी झापड
बिग बॉसने बनवलेल्या जोडीपैकी एक म्हणजे तन्वी कोलते आणि रुचिता जामदार, ज्या पहिल्या दिवशी एकमेकांशी भिडल्या होत्या. आता बेडीमुळे एकत्र असल्याने त्यांना एकमेकींसोबत सतत राहणं भाग पडत आहे. त्यामुळे त्यांच्यातील दुरावा हळूहळू कमी होताना दिसतो आहे. तब्बल 3 आठवड्यांनी त्या एकमेकींशी प्रेमाने, शांतपणे बोलताना दिसल्या आहेत.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता दोघी एका सोफ्यावर बसल्या आहेत. त्यांच्यासोबत अनुश्री आणि राकेशही बसला आहे. रुचिता समोर बसलेल्या आयुषला हाक मारून विचारते की तू आज पाण्यात उतरला होतास ना? यावर अनुश्री विचारते तुम्ही बेल्ट घालून पाण्यात गेला होता? त्यावर आयुष नाही, हात धरून, असं उत्तर देतो. यावर राकेश प्लॅन फ्लॉप, तुला एकटीला जावं लागेल, असं रुचिता म्हणतो. यावर रुचिता म्हणते, मला कुठे रोमान्स करायचा आहे तिच्यासोबत पाण्यात. यावर तन्वी नवीन काही तरी विचार कर गं, इतक्या सहजासहजी नाही येणार झाशेत असं म्हणते.
Bigg Boss Marathi 6 : खरा 'डॉन' निघाला! प्रभू शेळकेने 'बिग बॉस'च्या घरात अखेर आपला रिअल अवतार दाखवला
तसंच पुढे तुझं माझं जमेना, तुझ्याविना करमेना असा डायलॉग मारते. यावर रुचिता मला खूप करमतं पण आता काय करू असं म्हणते, तिचं वाक्य पूर्ण होत नाही तोच तन्वी अगं मला पण करमतं पण तुझ्याशिवाय असं सांगते.
एकंदर पाहिलं तर रुचिता आणि तन्वी यांच्या तसा वादच सुरू आहे, पण तो अगदी शांत आणि प्रेमाने. जे आजवर कधीच पाहायला मिळालं नाही. आतापर्यंत त्यांच्यात असं संभाषण पाहायला मिळालं नव्हतं.
