बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. जो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. अरे देवा काय रे हे, लेव्हल सोडली शोने, अशा प्रतिक्रिया हा प्रोमो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर उमटत आहे. असं नेमकं बिग बॉसच्या घरात घडलं तरी काय पाहुयात.
Bigg Boss च्या घरात असलेल्या तन्वी कोलतेला बाहेर मोठा फटका! इन्स्टाग्राम अकाऊंट अचानक गायब
advertisement
प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता सुरुवातीला राखी तन्वीला विचारते हा कुठला डान्स आहे, यावर तन्वी तिला उत्तर देते त्याला विचार ना. यानंतर राकेश तन्वीला किस करताना दिसतो आहे. पुढे तो राखीसमोरही पुन्हा तन्वीला किस करतो. राखी रागात त्यांच्याकडे बघताना दिसते. नंतर ती दोघांसमोर म्हणते माझा परिणाम बघा आणि स्वत:चे केस कापताना दिसते.
राकेश आणि तन्वी तिला विचारतात की राखी तू हे काय करते आहे, राखी म्हणते, राकेश मी शिक्षा देते आहे. कुणी मला दुखवू शकत नाही मी स्वत:च मला हर्ट करू शकते, असं म्हणत ती रडते. प्रोमोच्या शेवटी राखीच्या रडण्याचा आवाज येतो.
राखीच्या या कृत्याने घरातील सगळ्या सदस्यांना धक्का बसलेला दिसतो. रुचिता, राकेश तोंडावर हात घेतात. दिपाली राखीला धीर देताना दिसते. 'राकेशमुळे दुखावलं राखीचं मन', असं कॅप्शन या पोस्टला देण्यात आलं आहे.
Rashmika Vijay : लग्नाआधीच ठरलं होतं! लग्नानंतर एकत्र दिसणार नाहीत रश्मिका-विजय?
पण घरातील हा नवा ड्रामा प्रेक्षकांना मात्र आवडलेला नाही. जवळपास सगळ्यांनीच नाराजी व्यक्त केली आहे.
