बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचे प्रोमो समोर आले आहेत. ज्यात जेवणावरून वाद झालेला दिसतो आहे. अनुश्री माने आणि प्राजक्ता शुक्रेमध्ये हा वाद झाला आहे. प्रोमोत तुम्ही पाहू शकता किचजनजवळ सोफ्यावर प्राजक्ता बसली आहे. तर अनुश्री आणि रुचिता डायनिंग टेबलवर.
बाद! बाद! Bigg Boss Marathi 6 मध्ये मोठा ट्विस्ट; 'बिग बॉस'ने संपूर्ण गेमच फिरवला
advertisement
अनुश्री प्राजक्ताला बोलते तुमच्यामुळे जेवण थांबलाय ना सगळ्यांचं. आपण आपली ड्युटी करायची आणि त्यांनी त्यांची जेवणाची ड्युटी करायची नाही. मी माझी ड्युटी करून आले आहे, मला जेवण मिळायलाच पाहिजे. करून घ्या ना ते. तिथल्या तिथं कचरा आहे. यावर प्राजक्ता म्हणते मी नाही झुकणार आहे.
अनुश्री आणि प्राजक्ताच्या बोलण्यावरून हा वाद कचरा आणि जेवण यावरून झाला आहे. याआधी राखी आणि प्राजक्तामधील संवादाचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात राखी प्राजक्ताला कचरा काढायला सांगते. त्यावर प्राजक्ता मुलं करतील मिळून मी आता अंघोळ केली आहे, अंघोळीनंतर कचरा काढायला मला जमणार नाही असं सांगते.
यावर राखी भडकते आणि बोलते, बिग बॉसने मला काम सांगितलं आहे, ते मी करणाच. हे लोक मला सीरिअसली घेत नाहीत. जे होणार ते मी आता बघून घेणार. मी आता कुणालाही रिक्वेस्ट करणार नाही.
राखी, प्राजक्ता आणि प्राजक्ता अनुश्री यांच्यातील संवाद ऐकल्यानंतर प्राजक्ताने केर काढला नाही म्हणून राखीने घरातील सगळ्यांचं जेवण बंद केल्याचं दिसतं आहे. म्हणजे एकाच्या चुकीची शिक्षा सगळ्यांना मिळते आहे.
आता प्राजक्ताचा आडमुठेपणा घरातील इतर सदस्यांना भोवणार का? त्याचा कोणता परिणाम होणार, बिग बॉसच्या घरात कोणता नवा ड्रामा पाहायला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
