मात्र आता चित्र बदललेलं दिसत आहे. आजच्या एपिसोडमध्ये रुचिता टोळीचा गेम पलटवताना दिसणार आहे. विशाल आणि रुचिता बसलेले असताना रुचिता विशालला म्हणते, उद्यापासून मी इंडिविज्युअल प्लेअर. तिच्या या निर्णयाने विशाल नाराज होतो. तो तिला म्हणतो, "तुम्ही फक्त टोळी टोळी करता. टोळीची सर्वात जास्त गरज तुम्हा तिघांना आहे, मला नाही".
advertisement
रुचिताने मात्र तिच्या भूमिकेवर ठाम राहते. ती स्पष्टपणे सांगते, "टोळी हा शब्द सोडूनही मला माझं एक अस्तित्व निर्माण करायचं आहे". विशाल म्हणतो, "तुमच्या डोक्यात घातलं लोकांनी. रुल्सच्या अगेस्ट सगळं डिस्कस करत होते."
यावर रुचिताने शांतपणे उत्तर दिलं. ती म्हणाली, "हो, सगळे डिस्कशन करत होते पण मला त्यात नाही यायचं. माझ्या डोक्यात एवढंच होतं की नॉमिनेशन डिस्कशनमुळे उठवलंय. मला ती गोष्ट रिपीट नव्हती करायची." रुचिताच्या निर्णयावर अखेर विशाल तिला म्हणतो, "उद्यापासून तुम्ही तुमचं खेळा मी माझं खेळतो."
या संभाषणातून हे दिसून येत आहे की विशाल आणि रुचिता यांच्यात दुरावा येत आहे. विशालने प्रेमाचं गाजर दाखवत गेम खेळला का? की हा दोघांचा गेम होता? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. आता टोळीशिवाय रुचिता कशी खेळणार हे पाहणं इंट्रेस्टिंग ठरणार आहे.
