पहिल्या आठवड्यात सोनाली राऊतची चोरी अनुश्री माने हिने चोरली. तो तिचा गेम होता असं तिनं सगळ्यांना सांगितलं. चावी चोरीला गेल्याचा आळ सागर कारंडे, सचिन कुमावत आणि आयुष संजीववर आला. तिघांनीही आरोप मनावर घेतला आणि तो खोटा असल्याचं सिद्ध करण्यासाठी न जेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे घरातील संपूर्ण वातावरण बिघडलं.
advertisement
चावी प्रकरण सुरू असताना घरात विविध कारणांवरून भांडणं सुरू होती. अशातच तिसरा आठवडा सुरू होत नाही तोच बिग बॉसने दिलेल्या राशनमध्ये सदस्यांची अंडी गायब झाली. ही अंडी टोळीच्या सदस्यांनीच चोरल्याचं कबूल देखील केलं. आधी चावी अनुश्रीने चोरल्याचं कबूल केलं त्यानंतर आता अंडी देखील अनुश्रीनेच मस्करीमध्ये चोरली आणि ती परत दिली. पण अनुश्री ऐवजी तिच्या चोरीची जबाबदारी विशालने घेतली.
यानंतर घरात दिव्याने टोळीचं जेवण करणार नाही असा निर्णय सांगितला. त्यानंतर टोळीचं जेवण बनवणार नाही असा ठाम निर्णय इतरांनी घेतली. या सगळ्यात टोळीतील रोशनने टोळीची साथ दिली नाही.
अंडी चोरण्याचा राडा सुरू असताना आजच्या भागात घरात आणखी एक चोरी झाल्याचं पाहायला मिळणार आहे. बिग बॉसचा नवा प्रोमो समोर आला आहे ज्यात विशालचा बॉडीवॉश चोरीला गेला असून तो त्याला कॅप्टन आयुषच्या रूममध्ये सापडतो असं दाखवण्यात आलं आहे.
प्रोमोमध्ये विशाल म्हणतो, माझं एक पूर्ण बॉडीवॉश हरवलं होतं. चोरी एक वृत्ती आहे असं मी ऐकलं. आमचं जेवण बंद केलं तुम्ही तीन वेळेचं.त्यानंतर विशाल बॉडीवॉशची बाटली आणून जमिनीवर फेकतो आणि म्हणतो मला आता कॅप्टन रूममध्ये ही बॉटल मिळाली. त्यावर आयुष म्हणतो, ती तिथे किती दिवसांपासून पडली आहे. त्यावर विशाल म्हणतो, तुम्ही डिसाइड करा की कोणाचं जेवण बंद करायला चालले आहेत.
