अॅनिमल सिनेमातील बॉबी देओलच्या एंट्रीच्या गाण्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. जमाल जमालू या गाण्यावर बॉबीची एंट्री होते. नवरदेवाच्या वेशात बसलेला बॉबी निकाह करत एंट्री घेतो आणि त्याच्या एंट्रीला हे गाणं वाजतं. बॉबी देओलच्या पावर पॅक परफॉर्मन्सचं प्रेक्षक कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे त्या गाण्याची देखील चर्चा आहे.
हेही वाचा - Animal Review : अॅनिमल खरंच अॅनिमल आहे का? हिंदी सिनेमांचा ठरेल का माईलस्टोन?
advertisement
बॉबी देओलच्या एंट्रीला वाजत असलेलं जमाल जमालू हे गाणं जवळपास 50 वर्ष जूनं आहे. हे एक ईराणी गाणं असून या गाण्याचं म्युझिक खास करून सगळ्यांच्या पसंतीस उतरलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे गाणं एक कविता आहे. ईराणी कवी Bijan Samandar यांनी ही लिहिली आहे. 1958मध्ये रेंडिशन Shirazi Choirvr यांनी हे गाणं गायलं आहे. Kharazemi Girl's High Schoolमध्ये शिकणाऱ्या काही शालेय विद्यार्थींच्या ग्रुपनं हे गाणं गायलं होतं. या गाण्याची लोकप्रियता इतकी वाढली की अल्पावधीतच हे गाणं ईराणी पार्टी आणि लग्नात वाजायला सुरूवात झाली.
2013मध्ये या गाण्याचा एक व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. अॅनिमल सिनेमात हे गाणं ऐकल्यानंतर त्याचे व्हयूज चांगलेच वाढले आहेत. ईराणी भाषेतील हे गाणं ट्रान्सलेट केलं तर त्याचा अर्थ असा होतो की, ओ माय क्यूटनेस, माझ्या मनाशी खेळू नकोस. तू प्रवासाला निघाला आहेस आणि मी वेडा होतोय. ओ माय लव…
अॅनिमल सिनेमानं रिलीजच्या दिवसापासून तगडी कमाई केली आहे. मंडे टेस्टमध्ये देखील अॅनिमल हिट ठरला आहे. सिनेमानं आतापर्यंत 246.23 कोटी रूपये कमावले आहेत.