Animal Review : अॅनिमल खरंच अॅनिमल आहे का? हिंदी सिनेमांचा ठरेल का माईलस्टोन?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
कबीर सिंग बघून तुम्ही डिस्टर्ब झाला असाल तर अॅनिमल बघून तुमची शुद्ध हरवू शकते. तुम्हाला कबिर सिंग टॉक्झिक वाटत असेल तर कबिर सिंग अॅनिमलचा फक्त ट्रेलर आहे. कसा आहे अॅनिमल? थिएटरमध्ये जाण्याआधी हा रिव्ह्यू एकदा वाचा.
अमित मोडक, प्रतिनिधी
मुंबई, 01 डिसेंबर : करवा चौथचा दिवस आहे. बायको दिवसभर उपाशी आहे. रात्री उशिरा आलेला नवऱ्याचा चेहरा बघून उपवास सोडायचा आहे. आणि चंद्राच्या साक्षीनं चेहरा बघतांना तो नवरा बायकोला सांगतो माझे दुसऱ्या बाईसोबत संबंध आहेत. असे सिन्स अशा सिच्युएशन ज्या तुम्ही इमॅजीन केल्या नसतील. अशा अकल्पनीय प्रसंगांनी खचाखच भरलेला सिनेमा म्हणजे अॅनिमल.
advertisement
कबीर सिंग बघून तुम्ही डिस्टर्ब झाला असाल तर अॅनिमल बघून तुमची शुद्ध हरवू शकते. तुम्हाला कबिर सिंग टॉक्झिक वाटत असेल तर कबिर सिंग अॅनिमलचा फक्त ट्रेलर आहे. हिंदी सिनेमात तुम्ही याआधी जे बघितलं नाही. ते सर्वं संदीप रेड्डी बेधडक,बेपर्दा दाखवतो. जे डायलॉग्ज ऐकले नाही अशा डायलॉग्जची रीघ लावतो. नात्यात-समाजात जे घडतं. पण आपल्याला बघायच नाही, ऐकायच नाही, दिसलं तर मान फिरवायची आहे. ते सगळं अॅनिमल तुमच्या तोड्यांवर फेकून मारत. असा सिनेमा याआधी आला नाही. अॅनिमलमल हिंदी सिनेमाचा माईलस्टोन आहे. नवे वाद हा सिनेमा सुरू करणार आहे.
advertisement
स्टोरी काय आहे?
ट्रेलर बघून तुम्हाला कळलच असेल ही बाप-लेकाची कथा आहे. बापाला मुलासाठी वेळ नाही. पण मुलगा बापावर वेड्यासारख प्रेम करतो. मुलाची ( रणबीर कपूर ) एकच इच्छा आहे बापाच ( अनिल कपूर) व्हॅलिडेशन मिळावं. बापाला प्रोटेक्ट करायसाठी तो काहीही करू शकतो आणि करतो. सिंपल स्टोरी आहे. सिनेमा सिंपल नाही.
advertisement
अभिनय कोणाचा भारी ?
अभिनयाबद्धल बोलायच तर नबोलता बॉबी देओल भाव खाऊन जातो. बॉबी पडद्यावर आल्यावर थिअटरमध्ये टाळ्या-शिट्ट्यांचा आवाज घुमतो. बॉबी कमाल दिसतो.अक्शनही जबरदस्त करतो. त्याचा रोल आणखी मोठा हवा होता अशी रुखरुख कायम राहते. रश्मिका मंदानाचे डायलॉग्ज काही सीन्समध्ये कळत नाहीत. दोन सिन्स असे आहेत जिथे रश्मिका बाजी मारते. तीचं पात्र कॉम्पलेक्स आहे आणि अभिनय सहज.
advertisement
अनिल कपूर बापाच्या रोलमध्ये परफेक्ट कास्टींग आहे. रणबीर आणि अनिल कपूरचे सीन्स पडद्यावरुन नजर हटवू देत नाहीत. अनिल कपूरची भूमिका आणखी खुलून यायला हवी होती. बाप म्हणून अनिल कपूरची बाजू पुढे येत नाही. अनिल कपूरच्या पात्राकडे थोडं दुर्लक्ष झालंय. मराठी प्रेक्षकांसाठी सप्राईज आहे उपेंद्र लिमये. 2 मीनटांसाठी आलेला उपेंद्र प्रेक्षकांच्या लक्षात राहतो.
advertisement
रणबीरचा अॅनिमलमधला अभिनय आजपर्यंतचा सर्वोत्तम आहे. रणबीर कपूर रणविजयची भूमिका जगलाय. बापाबद्धलच प्रेम,राग त्याच्या डोळ्यात दिसतो. गन हाती असल्यावर त्यांच्यातला हैवानही दिसतो.
रणबीर कपूर अक्शन सीन्स
इतक्या सहज करेल यावर विश्वास बसत नाही. केजीएफमधला मशीनगनचा सीन तुम्ही अॅनिमलमधला सीन बघितल्यावर विसराल. साऊथ स्टारसारखा अँडिट्युड बॉलीवूडकडे नाही असं केजीएफ आणि पुष्पा बघितल्यावर वाटायच. तो अँडिट्युड तुम्हाल रणबीर कपूरमध्ये बघायला मिळेलं. पडद्यावर तुम्हाला माणूस नाहीतर अनिमल-हैवान बघतोय असं वाटेलं.
advertisement
संदीप वांगा-रेड्डी
मी तुम्हाला दाखवतो व्हायलन्स काय असतो? संदीप वांगा रेड्डीनं आपले शब्द खरे केलेत. भारतीय सीनेमात याआधी तुम्ही कधीही बघितलं नाही ते सर्वं अॅनिमलमध्ये दाखवलंय. तुम्ही विचारही करू शकणार नाही ते सगळं वांगाने आपल्या सिनेमात दाखवलंय. समाजातल्या, माझ्या तुमच्या मान्यतांना संदीप फक्त धक्का देत नाही तर कडेलोट करून टाकतो. यातला व्हायलन्स, डायलॉग्ज,सेक्स सीन्स,शिव्या अनेकांच्या पचनी पडणार नाही. अनेक सीन्स तुम्ही पचवू शकणार नाही. खासकरून महिलांना हा सिनेमा ऑफेंड करू शकतो. व्हायलन्स झोप ऊडवू शकते.
या सिनेमामुळे खूप सारे वाद सुरू होणार आहेत. कॉन्ट्रव्हर्सीज होणार आहेत. अशा सिनेमामुळे समाजवर काय परिणाम होईल? असे डायलॉग्ज ऐकायला मिळतील. हा सिनेमा तुम्हाला आवडेल किंवा अजिबात आवडणार नाही. मिडल ग्राऊंड असणार नाही. मला अनिमल आवडला. साडेतीन तासांच्या सिनेमानं थिएटरमध्ये बांधून ठेवलं. सिनेमा-सिनेमासारखा तुम्ही बघत असाल. सिनेमा जास्त इंटलॅक्चुलाईडज करणारे तुम्ही नसाल. व्हायलन्समुळे डिस्टर्ब होत नसाल तर अॅनिमल नक्की बघा.
या सिनेमातून घेण्यासारखं काहीच नाही. पण संदीप रेड्डी वागानं उभं केलेलं जग एकदा नक्की अनुभवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 01, 2023 7:43 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Animal Review : अॅनिमल खरंच अॅनिमल आहे का? हिंदी सिनेमांचा ठरेल का माईलस्टोन?