animal movie : रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'ची स्टोरी सेम 'या' सिनेमाची? लोकांनी केलं ट्रोल

Last Updated:

अ‍ॅनिमल या रणबीर कपूरच्या चित्रपटाची अनेक चाहते वाट पाहत आहेत. त्याचं कारण या चित्रपटातली त्याची भूमिका. एका गँगस्टरच्या रूपातला नायक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

animal - ranbir kapoor
animal - ranbir kapoor
मुंबई, 27 नोव्हेंबर : बॉलिवूडमधल्या यंदाच्या काही मोठ्या चित्रपटांपैकी ‘अ‍ॅनिमल’ हा रणबीर कपूरचा चित्रपट लवकर प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूडमधला चॉकलेट बॉयची प्रतिमा असलेला रणबीर कपूर या सिनेमात गँगस्टरची भूमिका साकारणार असल्याने त्याच्या चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यानंतर या सिनेमाविषयी एक नवा वाद सुरू झाला. काहींच्या मते हा चित्रपट बॉलिवूडमधल्या एका चित्रपटाची कॉपी आहे.
अ‍ॅनिमल या रणबीर कपूरच्या चित्रपटाची अनेक चाहते वाट पाहत आहेत. त्याचं कारण या चित्रपटातली त्याची भूमिका. एका गँगस्टरच्या रूपातला नायक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला. 1 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल; मात्र ट्रेलरनंतर या चित्रपटाच्या कथानकावरून नवा वाद चाहत्यांमध्ये पसरला आहे. हा चित्रपट अक्षय कुमार व अमिताभ बच्चन यांच्या एका चित्रपटाची कॉपी असल्याचं काही चाहत्यांचं म्हणणं आहे.
advertisement
अ‍ॅनिमल चित्रपटाच्या ट्रेलरचा एक वेगळा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. त्यात अ‍ॅनिमल सिनेमासोबतच अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या 'एक रिश्ता' आणि 'वक्त' या सिनेमांचे सीन्स जोडण्यात आलेत. त्यात रणबीर कपूरप्रमाणेच अक्षय कुमारही खूप वेळा 'पापा पापा' असं म्हणताना दिसतोय. 'एक रिश्ता' आणि 'वक्त' या दोन्ही चित्रपटांची कथा मुलगा व वडिलांच्या नात्यावर आधारित होती. 'अ‍ॅनिमल' चित्रपटाची कथाही त्याच धर्तीवर आहे. त्यामुळे काही जणांचं म्हणणं आहे, की 'अ‍ॅनिमल' चित्रपट त्या दोन्ही चित्रपटांपेक्षा नक्कीच सरस असेल. काहींच्या मते आधीचे 2 चित्रपट चांगले होते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या या संदर्भातल्या प्रतिक्रिया येत आहेत.
advertisement
'कबीर सिंग' आणि 'अर्जुन रेड्डी' या चित्रपटांचं दिग्दर्शन केलेल्या संदीप रेड्डी वांगा यांनी या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन केलं आहे. रणबीर कपूरसह अनिल कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल, शक्ती कपूर, सुरेश ओबेरॉय, प्रेम चोप्रा, तृप्ती डिमरी यांच्या यात भूमिका आहेत. भूषण कुमार व कृष्ण कुमार यांची टी-सीरीज कंपनी, मुराद खेतानी यांचा सिने1 स्टुडिओज आणि प्रणय रेड्डी वांगा यांच्या भद्रकाली पिक्चर्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
advertisement
या चित्रपटावरून सुरू झालेला वाद आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच थांबेल. हा चित्रपट खरोखरच त्या चित्रपटांसारखा आहे, की त्यापेक्षा वेगळं काही चाहत्यांना यात पाहायला मिळेल, ते चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
मराठी बातम्या/मनोरंजन/
animal movie : रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'ची स्टोरी सेम 'या' सिनेमाची? लोकांनी केलं ट्रोल
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement