Animal : खतरनाक! खतरनाक! आलियानं दिला नवऱ्याच्या सिनेमाचा Review, Video चर्चेत
- Published by:Minal Gurav
Last Updated:
आलिया आपली आई सोनी राजदान, बहिण शाहीन आणि वडील महेश भट्ट यांच्याबरोबर 'एनिमल' सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला गेली होती.
मुंबई, 01 डिसेंबर : बॉक्स ऑफिसवर आज दोन बॉलिवूड सिनेमे येऊन धडकले आहेत. त्यातील अभिनेता रणबीर कपूरचा 'एनिमल' हा सिनेमा आहे. एनिमलच्या ट्रेलरनंच प्रेक्षकांना हलवून टाकलं होतं. दमदार अँक्शन सीन्सनी आणि रणबीरच्या लुकनं सगळ्यांचं लक्ष वेधलं. त्याचप्रमाणे सिनेमात अभिनेता बॉबी देओलनं देखील त्याच्या दमदार एंट्रीनं संपूर्ण ट्रेलर त्याच्या बाजूनं फिरवला. रणबीर आणि बॉबी देओल असे दोन तगडे अभिनेते एकमेकांसमोर आले आणि प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरली. अखेर आज 1 डिसेंबर रोजी 'एनिमल' हा सिनेमा रिलीज झाला. रणबीरच्या सिनेमाचा पहिला रिव्ह्यू त्याच्या बायकोनं म्हणजेच अभिनेत्री आलिया भट्ट हिनं दिला आहे.
अभिनेत्री आलिया भट्ट नवऱ्याचा 'एनिमल' हा सिनेमा पाहण्यासाठी पोहोचली. सिनेमा पहिल्यानंतर आलियाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. नवऱ्याच्या नव्या सिनेमावर आलिया चांगलीच खुश असल्याचं पाहायला मिळतंय. खरंतर रणबीर कपूरच्या आतापर्यंतच्या करिअरमधला एनिमल हा सिनेमा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आतापर्यंतच्या सगळ्या सिनेमातील त्याचा हा वेगळा सिनेमा आहे.
हेही वाचा - Sam Bahadurच्या स्क्रिनिंगला सासूबरोबर लावली हजेरी; संस्कारी सून कतरिनाचा नवा Videoव्हायरल
advertisement
advertisement
'एनिमल' सिनेमा आणि त्यातील रणबीरचा अवतार पाहून आलिया चांगलीच एम्प्रेसझाली आहे. थिएटरमधून बाहेर येताच आलियानं रणबीरच्या एनिमलला 'खतरनाक' अशी रिअँक्शन दिली आहे. आलिया आपली आई सोनी राजदान, बहिण शाहीन आणि वडील महेश भट्ट यांच्याबरोबर सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला गेली होती. आलियानं दिलेला 'एनिमल' सिनेमाचा हा एका वाक्यातील रिव्ह्यू सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
advertisement
व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय, आलिया तिच्या फॅमिलीबरोबर 'एनिमल' पाहून बाहेर येतेय. बाहेर येताच पापाराझी तिला कसा वाटला सिनेमा असं विचारतात. तेव्हा आलिया आधी म्हणते 'अच्छा था'. त्यावर पापाराझी तिला पुन्हा एकदा विचारतात. तेव्हा ती 'खतरनाक ! खतरनाक!' असं म्हणते. आलियाची ही रिअँक्शन सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय.
अभिनेत्री आलियानं नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं होतं की, आम्ही एकमेकांच्या कामाबद्दल विस्तृत संवाद साधतो. एकमेकांच्या कामाचा आम्ही सन्मान करतोय. एक कलाकार म्हणून आम्ही एकमेकांच्या कामाकडे पाहतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 01, 2023 12:18 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Animal : खतरनाक! खतरनाक! आलियानं दिला नवऱ्याच्या सिनेमाचा Review, Video चर्चेत