अभिनेता बॉबी देओल यंदा रामलीलेत रावणाचा वध करणारआहे. बॉबी देओल हा चित्रपटसृष्टीतील अशा काही स्टार्सपैकी एक आहे ज्यांनी आपल्या कारकिर्दीची तीन दशके पूर्ण केली आहेत. तो अजूनही इंडस्ट्रीत सक्रिय आहे. त्याचे आकर्षण केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर दक्षिणेतही दिसून येते. म्हणूनच या वर्षी या कार्यक्रमासाठी बॉबी देओलची निवड करण्यात आली.
advertisement
लव कुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन कुमार यांनी सांगितले की, दसऱ्याला रावणाचा वध करण्यासाठी जेव्हा बॉबी देओलला आमंत्रित करण्यात आले तेव्हा त्यांनी उत्साहाने आमंत्रण स्वीकारले. या ऐतिहासिक रंगमंचावर बॉबी देओलची उपस्थिती रामलीला आणखी भव्य आणि संस्मरणीय बनवेल असा समितीचा विश्वास आहे.
चाहते उत्साहित
राजधानीसह देशभरातून लाखो प्रेक्षक दसऱ्याच्या संध्याकाळी लाल किल्ल्यावर जमतात. यावेळी बॉबी देओलची उपस्थिती कार्यक्रमाची भव्यता आणखी वाढवेल. गेल्या वर्षी रोहित शेट्टीचा चित्रपट सिंघम 3 दिवाळीला प्रदर्शित झाला होता. या कार्यक्रमासाठी चित्रपटातील स्टारकास्ट दिल्लीत पोहोचले होते. अजय देवगण, रोहित शेट्टी आणि करीना कपूर हे सर्वजण दिल्ली रामलीला पाहुणे म्हणून उपस्थित होते.