या अभिनेत्याकडून पोलिसांनी तब्बल 3.5 किलो कोकेन जप्त केलं आहे. अभिनेत्याला अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत अंदाजे 35 कोटी रुपये आहे. ही कारवाई चेन्नई कस्टम्स आणि महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) यांनी संयुक्तपणे केली.
advertisement
अभिनेता सिंगापूरहून भारतात परतल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला थांबवलं. तपासणीदरम्यान त्याच्या ट्रॉलीच्या खोट्या डब्यातून पांढऱ्या पावडरने भरलेले प्लास्टिक पाउच सापडले. फील्ड टेस्टमध्ये हा पदार्थ कोकेन असल्याचं निश्चित झालं.
चौकशीदरम्यान अभिनेत्याने दावा केला की त्याला ही ट्रॉली कंबोडियामध्ये अज्ञात व्यक्तीकडून मिळाली होती आणि ती चेन्नई विमानतळावर रिसीव्हरला द्यायची होती. मात्र, अधिकाऱ्यांच्या मते तो ड्रग्ज मुंबई किंवा दिल्लीसारख्या शहरांत नेण्याच्या तयारीत होता. या ठिकाणी मोठं ड्रग्ज नेटवर्क सक्रिय आहे.
सीमाशुल्क विभाग अभिनेत्याची ट्रॅव्हल हिस्ट्री चेक करत आहेत. अभिनेत्याचा याआधीही अशा ड्रग्ज कारवायांमध्ये सहभागी होता का हे शोधलं जात आहे. दरम्यान, DRI मोठ्या नेटवर्कचा तपास करत आहे.
स्टुडेन्ट ऑफ द इअर सिनेमातील हा अभिनेता कोण आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. पण पोलीस या प्रकरणाता तपास करत आहेत. दरम्यान मागील काही दिवसांत चैन्नईमध्ये दुसऱ्यांदा कोकन जप्त करण्यात आलं आहे. सप्टेंबर महिन्यात दोन जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली होती.