आजवर अनेक भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांना वेड लावलं. गँगस्टरची भूमिका साकारलेले पंकज त्रिपाठी त्यांच्या साधेपणाने आपल्या चाहत्यांचं मन जिंकलं आहे. अशातच आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलगीही मोठा धमाका करायला सज्ज झाली आहे. पंकज त्रिपाठी यांचा हा अभिनयाचा वारसा त्यांची लाडकी लेक आशी त्रिपाठी पुढे घेऊन जात आहे. पंकज त्रिपाठी यांनी नुकतेच आपले नवीन प्रॉडक्शन बॅनर लॉन्च केले असून, त्यांच्या पहिल्याच प्रोजेक्टमधून १८ वर्षांची आशी रंगभूमीवर पदार्पण करत आहे.
advertisement
'रूपकथा रंगमंच'ची सुरुवात
पंकज त्रिपाठी यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात थिएटरमधून केली होती आणि आता एका निर्माता म्हणून ते पुन्हा एकदा रंगभूमीकडे वळले आहेत. पंकज त्रिपाठी यांनी पत्नी आणि बिझनेस मॅनेजर मृदुला त्रिपाठी यांच्यासोबत मिळून 'रूपकथा रंगमंच' नावाचे नवीन प्रॉडक्शन बॅनर सुरू केले आहे. 'रूपकथा रंगमंच' अंतर्गत त्यांचा पहिला थिएटर प्रोजेक्ट 'लैलाज' हा आहे.
आशी त्रिपाठीचे थिएटर डेब्यू
'लैलाज' या नाटकामुळे पंकज त्रिपाठी आणि त्यांचे कुटुंब खूप उत्साहित आहे, कारण या नाटकाद्वारे त्यांची मुलगी आशी त्रिपाठी रंगभूमीवर आपला ठसा उमटवणार आहे. पंकज त्रिपाठी यांची १८ वर्षांची मुलगी आशी त्रिपाठी या नाटकात मुख्य भूमिकेत लाईव्ह परफॉर्मन्स देणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन फैज मोहम्मद खान यांनी केले आहे.
आशी त्रिपाठीने अभिनयाच्या जगात पाऊल ठेवण्याची ही पहिली वेळ नाही. आशीने गेल्या वर्षीच मैनाक भट्टाचार्या यांच्यासोबत 'रंग डारो' या म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले होते. आशी सहसा लाईमलाईटपासून दूर राहते, पण अभिनयाच्या क्षेत्रात येण्यासाठी तिची तयारी जोरदार सुरू आहे. सध्या ती म्युझिक व्हिडिओ आणि थिएटरमध्ये काम करत आहे, पण आता लोकांना तिच्या बॉलिवूड डेब्यूची वाट पाहत आहेत.
