'हा असा आजार...', रुटीन चेकअपला गेली अन् कॅन्सरने गाठलं! बॉलिवूड अभिनेत्रीच्या आयुष्यात आलेलं भयंकर वादळ
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood Actress Cancer Treatment : 2000चं दशक गाजवलेल्या अभिनेत्रीने तिचा कॅन्सरमधून बरं होण्याचा शॉकिंग प्रवास चाहत्यांसमोर मांडला आहे. तिने सांगितलं की कोणतीही लक्षण दिसत नसतानाही तिला हा भयंकर आजार झाला.
मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये अनेक अभिनेत्रींनी कॅन्सरशी यशस्वी लढा दिला आहे. हिना खान, दीपिका कक्कर, मनीषा कोईराला, सोनाली बेंद्रे, किरण खेर अशा कित्येक अभिनेत्री कॅन्सरशी लढा दिल्यानंतरही त्यांच्या चाहत्यांचं मनोरंजन करत आहेत. अशातच २०००चं दशक गाजवलेल्या अभिनेत्रीने तिचा कॅन्सरमधून बरं होण्याचा प्रवास अगदी मोकळेपणाने चाहत्यांसमोर मांडला आहे.
advertisement
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरीने काही वर्षांपूर्वी ब्रेस्ट कॅन्सरशी यशस्वीपणे लढा दिला आहे. २०१९ मध्ये कॅन्सरचे निदान झाल्यानंतर तिने २०२२ मध्ये हा अनुभव सार्वजनिकरित्या सांगितला. अलीकडेच तिने एका मुलाखतीत आपल्या निदानाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट उघड केली आहे, जी प्रत्येक महिलेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


