अखेर 28 नोव्हेंबरनंतर शनिदेवाकडून 3 राशींची सुटका होणार, अडचणी दूर होऊन घरात पैसाच पैसा येणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Shani Margi 2025 : शनिदेवांचे नाव घेताच अनेकांच्या मनात भीती आणि आदर या दोन्ही भावना निर्माण होतात. हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात शनिदेव ‘कर्मफळाचे दाता’ आणि ‘न्यायाचे देव’ म्हणून ओळखले जातात.
शनिदेवांचे नाव घेताच अनेकांच्या मनात भीती आणि आदर या दोन्ही भावना निर्माण होतात. हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात शनिदेव ‘कर्मफळाचे दाता’ आणि ‘न्यायाचे देव’ म्हणून ओळखले जातात. शनीच्या गतीचा माणसाच्या जीवनावर थेट आणि खोल परिणाम होतो. मात्र, शनी फक्त कठोरच नसतो तर अत्यंत दयाळूही असतो. 28 नोव्हेंबर 2025 रोजी शनि ग्रह मार्गी होणार असून, या बदलामुळे तीन राशींचे भाग्य चमकणार आहे. या राशींना आयुष्यात सकारात्मक बदल, नव्या संधी आणि आर्थिक स्थिरता मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया, कोणत्या राशींना या बदलाचा मोठा लाभ होईल.
advertisement
सध्या शनि वक्री अवस्थेत आहे. पण 28 नोव्हेंबर 2025 रोजी तो मीन राशीत मार्गी होणार आहे. शनीचा मार्गी होणे म्हणजे ग्रहाची चाल स्थिर व सरळ होणे. ज्योतिषानुसार, ही अवस्था अनेकांसाठी शुभ परिणाम देणारी असते. विशेषतः पुढील तीन राशींवर शनिदेव प्रसन्न होणार असून त्यांच्या जीवनात अडकलेली कामे पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे.
advertisement
मेष - मेष राशीसाठी शनि मार्गी होणे अत्यंत शुभ संकेत देणारे आहे. तुमच्या जीवनातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतील. नोकरी बदल, बढती किंवा नवीन व्यवसाय संधी मिळण्याचे संकेत आहेत. आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्याची ही वेळ आहे. करिअरमध्ये स्थिरता येईल आणि निर्णयक्षमता वाढेल.दीर्घ काळ अडकलेले व्यवहार आणि आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात. शनीची कृपा मेष राशीच्या लोकांना नव्या जोमाने पुढे जाण्याची संधी देईल.
advertisement
तूळ - तूळ राशीसाठी शनीचा हा बदल विशेष आणि अत्यंत महत्वाचा मानला जातो. कौटुंबिक जीवनात शांतता आणि आनंद मिळेल. घर,जमीन किंवा नवीन वाहन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. अडकलेले प्रकल्प पूर्ण होतील आणि कामातील स्थैर्य वाढेल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत बनेल. तुमच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे योग्य फळ या काळात मिळेल, असे ज्योतिष सांगतात.
advertisement
कुंभ - शनि ग्रहाचा स्वामीच कुंभ राशी असल्यामुळे या राशीच्या लोकांसाठी ही वेळ अत्यंत भाग्यशाली आहे.करिअरमध्ये मोठा बदल आणि यश मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून कौतुक आणि पदोन्नतीचे योग निर्माण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. आर्थिक संकटातून सुटका होऊ शकते. स्वतःच्या क्षमतांवर नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास मिळेल.


