Tata ने मार्केटमध्ये टाकला 'बॅाम्ब'! या SUV च्या एंट्रीने ऑटो मार्केटमध्ये खळबळ, लॉंचिंगचं काऊंटडाऊन सुरू

Last Updated:
Tata Sierra २८ वर्षांनंतर नव्या लूक, फाईव्ह-डोअर लेआउट, ट्रिपल-स्क्रीन डॅशबोर्ड, पेट्रोल डिझेल EV पर्यायांसह २५ नोव्हेंबरला लॉन्च होणार आहे.
1/7
भारताच्या ऑटोमोबाईलमधील एक प्रतिष्ठित नाव, एक जमाना गाजवणारी 'Legend' Tata Sierra तब्बल २८ वर्षांनंतर पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सज्ज झाली आहे. टाटा मोटर्सने २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या लॉंचिंगपूर्वीच एसयूव्हीचे (SUV) संपूर्ण रूप जगासमोर आणले आहे. २००३ मध्ये बंद झालेली 'सिएरा' २०२३ ऑटो एक्स्पोमध्ये कॉन्सेप्टच्या रूपात दिसली होती, तिचा नवा लूक पाहून स्पर्धेकही अवाक झाले आहेत.

advertisement
2/7
२५ नोव्हेंबरपासूनच या गाडीचं बुकिंग सुरू होईल अशी माहिती मिळाली आहे. संपूर्ण लूक बदलला असून एक स्टायलिश फिल देण्यात आला आहे. बॉक्ससारखा आखार आणि वरच्या बाजूला सपाट रुफ जुन्या सिएराची आठवण करुन देते. पण आता ती तीन नव्हे, नव्या कारला Five-door layout मिळणार आहे.

3/7
 समोरच्या बाजूला एलईडी लाईट बार, अतिशय आकर्षक हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत. १९-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील्स, ब्लॅक रूफ रेल आणि फ्लश डोअर हँडल्स. यामुळे तिला एक प्रिमियम लूकचा दर्जा मिळाला आहे.

4/7
टाटाच्या या मॉडेलमध्ये प्रथमच ट्रिपल-स्क्रीन डॅशबोर्ड लेआउट देण्यात आला आहे. यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मध्यभागी इन्फोटेनमेंट टचस्क्रीन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रवाशासाठी स्वतंत्र डिस्प्ले देण्यात आला आहे.

5/7
फीचर्सच्या बाबतीत 'सिएरा'ने कोणतीही कसर सोडलेली नाही. Dual-zone Automatic Climate Control, हवेशीर पॉवर्ड फ्रंट सीट्स, वायरलेस चार्जिंग, JBL चा १२-स्पीकर दमदार ऑडिओ सिस्टीम आणि मल्टी-कलर अॅम्बियंट लायटिंग देण्यात आले आहे. सुरक्षिततेसाठी यात एकाधिक एअरबॅग्ज, ३६०-अंशांचा कॅमेरा आणि लेव्हल-२ ADAS ची सुरक्षा मिळणार आहे.

6/7
सिएरा केवळ लूक आणि फीचर्समध्येच नव्हे, तर पॉवरमध्येही शक्तिशाली आहे. ही एसयूव्ही पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक (EV) अशा तिन्ही पर्यायांमध्ये येईल, पण आधी इंधन मॉडेल बाजारात दाखल होतील. यात टाटाचे नवे १.५ लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन डेब्यू करत आहे, जे सुमारे १६८ ते १७० एचपी पॉवर देईल.

7/7
६-स्पीड मॅन्युअल, टॉर्क कन्व्हर्टर आणि ७-स्पीड ड्युअल-क्लच (DCT) असे ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध असतील. टाटा मोटर्सच्या २०२५ मधील सर्वाधिक बहुप्रतिक्षित मॉडेल्सपैकी ही एक आहे. २५ नोव्हेंबर रोजी या 'लीजेंड'ची किंमत जाहीर होईल आणि ती ११ लाख ते २० लाख रुपयादरम्यान असण्याची शक्यता आहे. जुना बाज आणि नवी टेक्नॉलॉजी घेऊन आलेली ही सिएरा, बाजारात एक मोठे सिंहासन पटकावण्यासाठी सज्ज झाली आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement