इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला फोटो
चित्रांगदा सिंगने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रुग्णालयातील बेडवरून एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती बेडवर झोपलेली दिसत असून तिच्या हाताला सलाईन लावलेली आहे. हा फोटो शेअर करताना चित्रांगदाने एक छोटा पण सकारात्मक मेसेज लिहिला आहे. तिने म्हटले आहे, "लवकरच सशासारखी धावू शकेन!"
चित्रांगदाने तिला नेमका कोणता त्रास झाला आहे किंवा तिला रुग्णालयात दाखल करण्याचे कारण काय आहे, हे स्पष्टपणे सांगितले नाही. मात्र, हा फोटो व्हायरल झाल्यानंतर तिचे चाहते तिला 'गेट वेल सून' म्हणत आहेत.
advertisement
'हाऊसफुल ५' मध्ये व्हिलनची भूमिका गाजवली!
चित्रांगदा सिंगच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, ती नुकतीच 'हाऊसफुल ५' या सुपरहिट चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेमुळे ती खूप चर्चेत आली होती. विशेष म्हणजे, या कॉमेडी फ्रेंचायझीमध्ये तिने व्हिलनची भूमिका साकारली होती आणि तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. हा 'हाऊसफुल' मालिकेतील पाचवा चित्रपट होता, जो दोन भागांमध्ये प्रदर्शित झाला आणि दोघांचा क्लाइमॅक्स वेगवेगळा होता.
लवकरच सलमान खानसोबत दिसणार
चित्रांगदा सिंग लवकरच सुपरस्टार सलमान खानसोबत 'बॅटल ऑफ गलवान' या महत्त्वाकांक्षी चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट वास्तविक घटनांवर आधारित असून, त्यात भारत आणि चीन यांच्यातील संघर्षाची कहाणी दाखवली जाण्याची शक्यता आहे. या चित्रपटासाठीही तिचे चाहते उत्सुक आहेत.
