यावर्षी दोन्ही बहिणींना देब मुखर्जी यांची उणीव जाणवली. देब मुखर्जी हे राणी आणि काजोलचे काका होते, ज्यांचे याच वर्षी १४ मार्च रोजी निधन झाले. ते दरवर्षी दुर्गा पूजा पंडालमध्ये उपस्थित राहून त्यांच्यासोबत हा उत्सव साजरा करायचे. पण यावर्षी त्यांची गैरहजेरी राणी आणि काजोलला खूपच खटकली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये या दोघी एकमेकींना भेटताच गळेभेट करताना दिसत आहेत. या मिठीत त्यांचा आनंद आणि काकांची आठवण अशा दोन्ही भावना स्पष्टपणे दिसत आहेत. यावेळी काजोलची बहीण तनिषा मुखर्जी देखील तिथे उपस्थित होती. विशेषतः राणीच्या डोळ्यांतील भावना लगेच दिसून येत होत्या.
advertisement
अयान मुखर्जीही झाला भावूक
देब मुखर्जी हे प्रसिद्ध दिग्दर्शक अयान मुखर्जीचे वडील होते. काजोलने राणीला भेटल्यानंतर लगेचच अयानला मिठी मारली. अयान मुखर्जीलाही त्याच्या वडिलांची आठवण आल्याने तोही या क्षणी भावूक झाला होता. या भावूक क्षणांनंतर मुखर्जी कुटुंबाने एकत्र येऊन मोठ्या थाटात दुर्गा पूजेचा पहिला दिवस साजरा केला. काजोल सोनेरी रंगाची साडी आणि लाल बांगड्यांमध्ये पारंपरिक दिसत होती, तर राणी काळ्या-पांढऱ्या साडीत खूप सुंदर दिसत होती.
देब मुखर्जी यांनी 'तू ही मेरी जिंदगी', 'आसू बन गए फूल' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केलं होतं. त्यांच्या आठवणींनी यंदाची दुर्गा पूजा कुटुंबियांसाठी अधिक खास ठरली आहे.