TRENDING:

Rohit Shetty: मुंबईतल्या घरावर गोळीबार, कुटुंब हादरलं; दिग्दर्शक रोहित शेट्टीने घेतला महत्त्वाचा निर्णय

Last Updated:

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबईतील जुहूमधील अतिशय हाय- प्रोफाईल भागात असलेल्या निवासस्थानाबाहेर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. त्यानंतर दिग्दर्शकाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबईतील जुहूमधील अतिशय हाय- प्रोफाईल भागात असलेल्या निवासस्थानाबाहेर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने या हल्ल्यात कोणालाही इजा झालेली नाही, मात्र या घटनेने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली आहे. ही घटना मध्यरात्री 12:45 च्या सुमारास घडली आहे. या घटनेची फॉरेन्सिक टीमकडून सखोल चौकशी केली जात आहे. या गोळीबाराची जबाबदारी एका आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराने घेतली आहे. दरम्यान, दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर अचानक गोळीबार झाल्यानंतर त्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Rohit Shetty: रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी महत्त्वाची अपडेट; दिग्दर्शकाने घेतला महत्त्वाचा निर्णय
Rohit Shetty: रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी महत्त्वाची अपडेट; दिग्दर्शकाने घेतला महत्त्वाचा निर्णय
advertisement

पुढच्या दोन दिवसांसाठी रोहित शेट्टीने त्याचे सर्व काम रद्द केले असून त्याने त्याच्या जवळच्या मित्रांना पुढील किमान 48 तासांसाठी तरी न भेटण्याची विनंती केली आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, "रोहितची मुंबई पोलिसांकडूनही चौकशी सुरू आहे, तो त्यांना देखील चौकशीसाठी सहकार्य करत आहे. अभिनेत्याने त्याचा जबाब नोंदवला असून तो तपासात पूर्णपणे सहभागी आहे. त्याच्या घरी मुंबई पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. परंतु रोहितने त्याच्या फिल्म इंडस्ट्रीतील सर्व मित्र मंडळींना त्याच्या घरी येऊ नये, अशी विनंती केली आहे. तो त्यांच्याशी फक्त फोन कॉल आणि मेसेजद्वारे संवाद साधत आहे."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात घट, सोयाबीन आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री रोहित शेट्टीच्या घराबाहेर एका आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराच्या टीमकडून चार गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर लगेचच, जुहू परिसरातील शेट्टीच्या निवासी टॉवरभोवती मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मुंबई पोलिस आणि फॉरेन्सिक टीमने घटनेच्या सविस्तर चौकशीसाठी परिसराची संपूर्ण चौकशी करण्यात आली. दरम्यान, गोळीबाराच्या या घटनेत कोणीही दुखापत झाले नाही. पुणे शहर पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराच्या संदर्भात पुण्यातून चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे आणि पुढील तपासासाठी त्यांना मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले आहे. पुण्यातील धायरी, वारजे आणि कर्वेनगर परिसरातून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Rohit Shetty: मुंबईतल्या घरावर गोळीबार, कुटुंब हादरलं; दिग्दर्शक रोहित शेट्टीने घेतला महत्त्वाचा निर्णय
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल