‘थामा’च्या ट्रेलरची सुरुवात होते ती बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या दमदार डायलॉगने. त्यानंतर होते आयुष्मान खुरानाची धमाकेदार एन्ट्री. ट्रेलरमध्ये दिसतं की, आयुष्मान रश्मिकाच्या प्रेमात पडतो आणि तिथून त्याच्या आयुष्यात एक मोठा आणि भयानक ट्विस्ट येतो.
advertisement
सर्वात मोठा खुलासा म्हणजे, या दोघांनाही ‘व्हॅम्पायर’च्या भूमिकेत दाखवण्यात आलं आहे, ज्यामुळे हॉरर आणि कॉमेडीचा तडका जबरदस्त जमून आला आहे. तसेच, कॉमेडीचे किंग परेश रावल आयुष्मानच्या वडिलांच्या भूमिकेत दिसत आहेत. ट्रेलर लाँच एका मोठ्या कार्यक्रमात करण्यात आला, जिथे आयुष्मानसोबत अभिनेत्री श्रद्धा कपूरनेही लाल साडीत हजेरी लावली होती, जी खूपच सुंदर दिसत होती.
कधी रिलीज होणार फिल्म?
‘थामा’ हा चित्रपट याच वर्षी २१ ऑक्टोबर २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिल्यांदाच आयुष्मान आणि रश्मिकाची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. याआधी रश्मिका ‘छावा’ या हिंदी चित्रपटात विकी कौशलसोबत दिसली होती.
‘स्त्री’ आणि ‘मुंज्या’ सारखे हिट चित्रपट देणाऱ्या मॅडॉक फिल्म्सकडून हा नवा प्रयोग प्रेक्षकांना किती आवडतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.