धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे, ज्यामुळे संपूर्ण देओल कुटुंबासह बॉलिवूडवर चिंतेचे सावट पसरले आहे.
आयसीयूमधून व्हेंटिलेटरवर शिफ्ट
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रकृती बिघडल्यानंतर तातडीने त्यांना आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर सपोर्टवर हलवण्यात आले आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे व्हेंटिलेटरची मदत घेण्यात येत आहे. डॉक्टरांची विशेष टीम त्यांच्या प्रकृतीवर चोवीस तास लक्ष ठेवून आहे. दिलासा देणारी गोष्ट म्हणजे, सध्या ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत.
advertisement
मुलींना तातडीने अमेरिकेतून बोलावले
धर्मेंद्र यांची प्रकृती गंभीर झाल्याचे कळताच कुटुंबातील सदस्यांची रुग्णालयात धावपळ सुरू झाली आहे. सूत्रांनुसार, धर्मेंद्र यांचे पुत्र आणि अभिनेते सनी देओल आणि बॉबी देओल यांच्यासह कुटुंबातील सदस्य रुग्णालयात उपस्थित आहेत. प्रकृतीच्या गंभीरतेमुळे त्यांच्या मुलींनाही अमेरिकेतून तातडीने बोलावून घेण्यात आल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य अधिक स्पष्ट होते.
फिटनेस आणि करिअर
धर्मेंद्र आजही ते बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि सक्रिय ज्येष्ठ कलाकारांपैकी एक मानले जातात. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या आगामी 'इक्कीस' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता, ज्यात त्यांनी दमदार अभिनय केला आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल कुटुंब किंवा रुग्णालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि त्यांचे लाखो चाहते ते लवकर आणि पूर्ण बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
